Home मुंबई नाराज अजित पवारांची उपमुख्यमंत्रीपदाची 3 री वेळ..! विरोधकांना संभ्रम ही तर पवारांची...

नाराज अजित पवारांची उपमुख्यमंत्रीपदाची 3 री वेळ..! विरोधकांना संभ्रम ही तर पवारांची खेळी..?

45
0

आशाताई बच्छाव

IMG-20230703-WA0104.jpg

नाराज अजित पवारांची उपमुख्यमंत्रीपदाची 3 री वेळ..! विरोधकांना संभ्रम ही तर पवारांची खेळी..?

सातारा (अंकुश पवार, ठाणे जिल्हा अध्यक्ष तथा सातारा जिल्हा प्रतिनिधी, दैनिक युवा मराठा न्युज पेपर अँड चॅनल)

रविवारी दुपारी अजित पवारांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. धक्कातंत्राचा अचूक वापर करत भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसलाही सरकारमध्ये घेतलं. आता याचे दूरगामी परिणाम काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र महाराष्ट्र आता राजकीय भूकंपांना सरावतो आहे किंवा सरावला आहे असं म्हणता येईल. कारण २०१९ पासून झालेले तीन राजकीय भूकंप महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. आपण जाणून घेऊ कोण कोणते होते हे तीन भूकंप?
२३ नोव्हेंबर २०१९ पहाटेचा शपथविधी २३ नोव्हेंबर २०१९ हा असा दिवस होता ज्यादिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. त्यावेळी राज्यपाल पदावर असलेले भगतसिंह कोश्यारी यांनी या दोघांना शपथ दिली. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडून निकाल लागले होते. खरंतर भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना जनतेने बहुमत दिलं होतं. मात्र आता शरद पवार यांचे एकनिष्ठ सहकारी प्रफुल पटेल, सुनील तटकरे अशे विश्वासू लोक गेल्यामुळे विरोधकांच्या मनात ही तर खुद्द शरद पवारांच्या डोक्यातील खेळी नाही ना..? अशी शंका येऊ लागली आहे. कारण गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शरद पवार यांनी भेट घेतली होती.
आता महाराष्ट्रातील जनतेला विश्वास पटलं आहे की मतदान कोणालाही करुडेत जेउडे पक्ष निवडणुकीत उभे रहाते तेउदे राजकीय नाट्य घडाऊन सत्तेत येतातच त्यामुळे कार्यकर्ता नावाचा प्राणी आता स्वतःचे डोळे उघडून आपल्या भविष्य आणि परिवाराची काळजी घेईल. कार्यकर्त्यांच आपल्या नेत्यावर प्रेम असत मान्य आहे परंतु हे अशे नेते जे मनात आले की पक्ष बदलते ,मानत आले की आपल्या परिवाराला,मुलाला उभे कर्तेल, मानत आले की हवं तसे लोकशाहीचा खून करतात त्यांचे काही व्हिशन नसते फक्त समाजात राजकीय पोळी भाजून समाजाला जातीय,धार्मिक,आरक्षण विषयात गुंग ठेऊन सो कॉल्ड कार्यकर्ते यांच्या सोबत घेऊन राजकारण कार्याचे आपल्या पुढच्या ७ पिढ्यांचा भविष्य सुरक्षित करण्याची व्हिजन फक्त या अश्या दल बदलू नेत्यांमध्ये असते.
त्यामुळे शरद पवार हे अनुभवी ,हुशार व्यक्ती आहेत ते या पेचातून आणि विरोधकांना काय उत्तर देतात हे येणारे काळ किंवा त्यांची पुढची रणनीती ठरवेल. जे शिवसेनेचे झाले उद्धव ठाकरे यांना एका संजय राऊत यांचामुळे जो खेळ खेळवला गेला तो इतिहास पुनरावृत्ती राष्ट्रवादी पक्षात होते का हे पाहणे कुतुहुलाची होत आहे.

Previous articleदिवसेंदिवस रस्त्यांवर होणारे अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करा.असे निर्देश खासदार अशोकजी नेते यांनी परिवहन अधिकाऱ्यांना दिले.
Next articleमुखेड कृषी विभागाकडून कृषी संजीवनी सप्ताह संपन्न..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here