Home नांदेड मुखेड कृषी विभागाकडून कृषी संजीवनी सप्ताह संपन्न..

मुखेड कृषी विभागाकडून कृषी संजीवनी सप्ताह संपन्न..

72
0

आशाताई बच्छाव

IMG-20230703-WA0041.jpg

मुखेड कृषी विभागाकडून कृषी संजीवनी सप्ताह संपन्न..

नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार

मुखेड -तालुका कृषी अधिकारी मुखेड आयोजित कृषी संजीवनी सप्ताह दिनांक 25 जून ते 1 जुलै तालुका कृषी अधिकारी कार्यालय मुखेड येथे 25 जून 2023 पासून गाव निहाय कृषी सहाय्यक यांच्या स्तरावरून गाव बैठका घेऊन कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. विविध गावांमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले, त्यामध्ये बियाणे उगवणक्षमता तपासणी, बीज प्रक्रिया करणे, शंकी गोगलगाय नियंत्रण, गोगलगायीचे नियंत्रण, तूर पिकावरील कीड व रोग नियंत्रण ,कपाशी वरील किड व रोग नियंत्रण ,आपत्कालीन पीक व्यवस्थापन नियोजन, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले  1 जुलै रोजी कृषी संजीवनी सप्ताहाची सांगता, कृषीदिन साजरा करून करण्यात आला. कृषी दिनानिमित्त वसंतरावजी नाईक साहेब यांच्या 110 व्या जयंतीनिमित्त तहसील कार्यालय मुखेड येथे साजरा करण्यात आला . कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली, तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांना आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य निमित्ताने पौष्टिक तृणधान्य चे मिनी किट देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सदाशिव पाटील मुखेडकर व कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवकुमार जी महाजन प्रगतिशील व प्रयोगशील शेतकरी यांनी भूषवले  व्यासपीठावर उपस्थित नायब तहसीलदार पांडुरंग गंगनर साहेब, तालुका कृषी अधिकारी अरुण गवई साहेब, कृषी विभागामार्फत आयोजित कार्यक्रमांमध्ये नाविन्यपूर्ण नियोजन करून शेतकऱ्यांना आपत्कालीन पीक परिस्थिती नियोजनाबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. व सध्या उशिरा पर्यंत सुरू न झालेल्या पावसाबाबत पेरणी करताना घ्यावयाची काळजी, 80 ते 100 मिलिमीटर पूर्णपणे पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, इत्यादी बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले .कार्यक्रमासाठी तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी तसेच व पत्रकार बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळ कृषी अधिकारी मुखेड श्री विकास नारनाळीकर यांनी केले व शेतकऱ्यांना सोयाबीन लागवड, तंत्रज्ञान कापूस लागवड, तंत्रज्ञान आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त शेतकऱ्यांच्या आहारामध्ये पौष्टिक तृणधान्याचा वापर वाढवा या अनुषंगाने पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व, पौष्टिक तृणधान्याचे मिनिकीट वितरण तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.
पंचायत समिती कृषी अधिकारी श्री देशमुख यांनी पंचायत समितीच्या शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या सर्व योजनांची माहिती दिली त्यातच शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी पात्रता व अर्ज करण्याबाबतचे आवाहन केले.
मंडळ कृषी अधिकारी मुक्रमाबाद भरत नागरे यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या महाडीबीटी संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने असलेल्या सर्व योजनेची माहिती दिली व शेतकऱ्यांच्या गरजेनुसार शेतकऱ्यांनी महाडीबीटी संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या मौजे बेरळी, चिवळी, अखरगाव केरुर, तांदळी येथील महिला बचत गट यांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच, तालुक्यातील प्रगतशील शेतकरी व प्रयोगशील शेतकरी जे आपल्या कार्यामधून शेती मध्ये विविध प्रयोग राबवतात व जास्तीत जास्त उत्पादन काढतात अशा शेतकऱ्यांचा सन्मान सुद्धा या कार्यक्रमांमध्ये करण्यात आला आहे. विशेषता शेतकरी बांधवांना सन्मानित करण्यासाठी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे असलेले प्रगतिशील शेतकरी यांच्या मार्फत सन्मानित करण्यात आले आहे. प्रगतशील शेतकरी सदाशिव पाटील जाधव मुखेडकर यांनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पौष्टिक तृणधान्याचा वापर करावा ,कमीत कमी खर्चामध्ये शेती करावी ,त्यासाठी नैसर्गिक शेती व शेणखताचा वापर करणे, शून्य मशागत तंत्रज्ञानाचा वापर, काडी कचरा अच्छादन करणे,
तसेच कमी खर्चाचे तंत्रज्ञान शेतामध्ये वापरून उत्पादन खर्च कमी करण्याबाबत आवाहन केले व शेतकऱ्यांनी त्यांच्या जीवनात होणारा अनावश्यक खर्च कमी करावे जेणेकरून कुटुंबावर आर्थिक ताण पडणार नाही व निरोगी राहण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकाचा वापर करावा असेही आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी गिरी कृषी सहाय्यक येवती यांनी केले ,कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कृषी पर्यवेक्षक संजय फुलारी, कृषी पर्यवेक्षक शेख साहेब, कृषी पर्यवेक्षक अजित राठोड, कृषी सहाय्यक समुद्र पती तिक टे, कृषि सहायक बाचणे, सोनकांबळे, शिंदे, भोसले, शिरसे, कचकलवार, शेटवाड, काळे ,विजापुरे ,वरताळे, जोशी, व सर्व कार्यालयीन कर्मचारी यांनी मेहनत घेतली कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापन जायभाये यांनी केले.

Previous articleनाराज अजित पवारांची उपमुख्यमंत्रीपदाची 3 री वेळ..! विरोधकांना संभ्रम ही तर पवारांची खेळी..?
Next articleउदयन गडाख यांच्या पुढाकारातून सोनई येथील तरुणांचे पंढरपूर स्वच्छता अभियान
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here