• Home
  • *कौळाणे (नि) येथे उद्या भुमिपुत्रांचा सन्मान सत्कार समारंभ*

*कौळाणे (नि) येथे उद्या भुमिपुत्रांचा सन्मान सत्कार समारंभ*

*कौळाणे (नि) येथे उद्या भुमिपुत्रांचा सन्मान सत्कार समारंभ* मालेगांव,(युवा मराठा न्युज नेटवर्क)-उद्या शुक्रवार दिनांक ४ सप्टेंबर २०२०रोजी भारतीय लष्करामध्ये १७ वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झालेले आर्मी जवान श्री. शिवराम दादाजी बच्छाव व श्री. विजय जगन्नाथ देसाई यांचा सेवापुर्ती सन्मान सोहळा आयोजित केला आहे. यावेळी कोरोना फायटर्स म्हणून आरोग्य सेवेतील कर्मचारी आशा वर्कर, पोलीस दलातील भूमिपुत्र ,तसेच भारतीय लष्करात सेवा बजावत असणारे जवान ,आणि पत्रकारितेच्या माध्यमातून गावाचे नाव उंचावणारे युवा मराठा न्युजचे मुख्य संपादक यांचाही सन्मान आयोजित केलेला असल्याची माहिती प्रशांत मधुकर कुलकर्णी यांनी दिली.
तसेच कार्यक्रमात पोलीस तथा लष्करात दाखल होऊ इच्छिणाऱ्या नवयुवक यांसाठी पोलीस अधीक्षक तथा प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे श्री प्रशांत बच्छाव साहेब यांचे मार्गदर्शनही लाभणार आहे.
या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून बारा बलुतेदार संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय बंडूकाका बच्छाव, पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, तहसीलदार सन्माननीय राजपूत साहेब, पंचायत समिती सदस्य गणेश खैरनार, माजी जि.प. सदस्य शांताराम नाना देसाई प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत कुलकर्णी हे करणार असून या कार्यक्रमाचे आयोजन कौळाणे (निं) ग्रामस्थांनी केलेले असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.

anews Banner

Leave A Comment