Home Breaking News गरोदर हत्तीणीला खायला दिलं फटाक्यांनी भरलेलं अननस, 3 दिवस पाण्यात उभी होती...

गरोदर हत्तीणीला खायला दिलं फटाक्यांनी भरलेलं अननस, 3 दिवस पाण्यात उभी होती पण..

162
0

🛑 गरोदर हत्तीणीला खायला दिलं फटाक्यांनी भरलेलं अननस, 3 दिवस पाण्यात उभी होती पण… 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मलप्पुरम (केरळ) 03 जून :⭕ उत्तर केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि अत्यंत दुर्देवी घटना समोर आली आहे. येथे काही लोकांनी एका गरोदर हत्तीणीला फटाके भरलेले अननस खाण्यास दिले, त्यामुळे या हत्तीणीचा नदीत उभ्या उभ्या मृत्यू झाला. प्राणी मानवावर लगेच विश्वास ठेवतात, मात्र अशा घटनांनी माणुसकीचा अंत झाल्याचं दिसतं.

ही हत्तीणी अन्नाच्या शोधात भटकत होती, 25 मे रोजी जवळच्या गावात आल्यानंतर तिला मुलांनी खायला दिलं. गर्भवती असल्यानं काहींना तिला फळ दिली. मात्र या गावातील मुलांनी फटाक्यांनी भरलेलं अननस खायला दिले. अननस खाताना अचानक फटाक्यांचा स्फोट झाला. ज्यामुळे हत्तीणीचा जबडा कापला गेला आणि दातही तुटले. वेदनांनी ग्रासलेल्या या हत्तीणीला काहीच कळलं नाही, तेव्हा ती वेलीयार नदीत उभी राहिली. वेदना कमी करण्यासाठी संपूर्ण वेळ फक्त पाणीच पित होती.

हत्तीणीला एवढ्या वेदना होत होत्या की ती तीन दिवस फक्त नदीत उभी होती. मात्र नदीतच तिचा मृत्यू झाला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हत्तीणीचं वय ते 14-15 वर्ष होत. हत्तीणीला योग्य वेळेत मदत मिळाली असती तरी तिचे प्राण वाचले असते. हत्तीणीची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी त्याचा बचाव करण्यासाठी दाखल झाले. पण ती पाण्याबाहेर न पडल्याने शनिवारी तिचा मृत्यू झाला.

वन अधिकारी मोहन कृष्णन यांनी आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केले की ही मादी हत्ती अन्नाच्या शोधात जंगलातून जवळच्या खेड्यात फिरत होती. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की हत्तीणी जखमी झाल्यानंतर गावातून पळून गेली पण कोणालाही काही केलं नाही. मोहन कृष्णन यांनी या भावनिक पोस्टमध्ये, गंभीर जखमी झाली परंतु असे असूनही तिने कोणाचे नुकसान केले नाही आणि तिच्यावर हल्ला केला. मानवांवर विश्वास ठेवल्यामुळे तिला ही शिक्षा मिळाली.⭕

Previous articleनिसर्ग चक्रीवादळ – समुद्रकिनारी यंत्रणा सज्ज
Next articleCyclone Nisarga : ‘या’ कारणामुळे कल्याण-डोंबिवली अनिश्चित काळासाठी अंधारात?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here