Home Breaking News Cyclone Nisarga : ‘या’ कारणामुळे कल्याण-डोंबिवली अनिश्चित काळासाठी अंधारात?

Cyclone Nisarga : ‘या’ कारणामुळे कल्याण-डोंबिवली अनिश्चित काळासाठी अंधारात?

101
0

🛑 Cyclone Nisarga : ‘या’ कारणामुळे कल्याण-डोंबिवली अनिश्चित काळासाठी अंधारात?🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 3 जून : ⭕ निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर वीज पुरवठा खंडीत होणं निश्चित आहे. पण कल्याण आणि डोंबिवली भागात अनिश्चित काळासाठी वीज पुरवठा खंडीत होऊ शकतो. कारण, या भागातील वीज वाहिन्या उघड्यावर आहेत आणि त्या सुरळीत करण्यासाठी किती वेळ लागेल याबाबत शंका आहे. मुंबईतही करोना रुग्णालयांमध्ये वीज पुरवठा खंडीत होऊ नये यासाठी वीज पुरवठा कंपन्यांनी सोय केली आहे.

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्टवर आहेत. एमएसईडीसीएलमधील सूत्रांच्या माहितीनुसार, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वीज पुरवठा कंपन्या पुरवठा खंडीत करण्याची शक्यता आहे. प्रभावित क्षेत्रातील ट्रान्सफॉर्मर आणि फीडर्स केले जातील, जेणेकरुन विजेपासून काही धोका निर्माण होऊ नये. तर आणखी एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सर्व वीज वितरण कंपन्या राज्य सरकारच्या आपत्ती निवारण विभागाच्या संपर्कात आहेत.

दरम्यान, कल्याण-डोंबिवली या क्षेत्रात बहुतांश वीज वाहिन्या उघड्यावर आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील वीज पुरवठा अनिश्चित काळासाठी बंद केला जाऊ शकतो. मंगळवारी सायंकाळीही कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापारूमध्ये दोन तासांसाठी वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. बरवे स्विचिंग स्टेशनवर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा पुरवठा खंडीत करण्यात आला होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबईसाठी बेस्टने तयारी केली आहे. बेस्टने काही जनरेटर स्टँडबायवर ठेवले असून अतिरिक्त मनुष्यबळही तैनात केलं आहे. बेस्टच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘सर्व रुग्णालयांचा वीज पुरवठा तातडीने सुरळीत करण्यावर आमचा भर असेल. विशेषतः कोविड केंद्र आणि कॉरेंटाईन झोनमध्ये असलेला वीज पुरवठा प्राधान्याने सुरळीत केला जाईल. दुसरीकडे टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटीनेही त्यांची पथके स्टँडबायवर ठेवली आहेत. अदानी इलेक्ट्रिसिटीच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वीज पुरवठ्याबाबत कोणत्याही चौकशीसाठी ग्राहक १९१२२ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

शॉर्टसर्किटवर खबरदारी घ्या

प्रशासनाकडून या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर विविध सूचना देण्यात आल्या आहेत. कोस्टल रोड, मेट्रो यांची कामे सध्या मुंबईत सुरू असून, या प्रकल्पांवर तैनात केलेले मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री यांची सुरक्षितता राखावी. त्याचप्रमाणे रेल्वे प्रशासनासोबत समन्वय साधावा. ठिकठिकाणी असलेल्या ओव्हरहेड वायर अथवा विजेच्या तारा या ठिकाणी शॉर्टसर्किट होऊन आग लागू नये, यासाठी खबरदारी घ्यावी. लॉकडाउननिमित्त पोलिसांनी बंदोबस्तासाठी ठिकाणी तंबू उभारून चौक्या बनवल्या असून त्या सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

घरांमध्ये पाणी शिरू नये

मिठी नदी सभोवतालचा परिसर, आरे वसाहत यांसह ठिकठिकाणच्या झोपडपट्टी भागांमध्ये जेथे घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता असते तेथ योग्य उपाययोजना कराव्यात. चक्रीवादळात वाऱ्याचा वेग लक्षात घेता रस्त्यांवर किंवा खुल्या जागांवर असणाऱ्या वस्तू, साहित्य हवेत उडून जाऊ शकते. त्यातून दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्व संबंधितांनी असे खुले साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, अशा सूचना प्रशासनाने केल्या आहेत.⭕

Previous articleगरोदर हत्तीणीला खायला दिलं फटाक्यांनी भरलेलं अननस, 3 दिवस पाण्यात उभी होती पण..
Next articleमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ सर्व घटकांना मिळणार – महाराष्ट्र शासनाचा महत्वपूर्ण निर्णय
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here