Home उतर महाराष्ट्र उदयन गडाख यांच्या पुढाकारातून सोनई येथील तरुणांचे पंढरपूर स्वच्छता अभियान

उदयन गडाख यांच्या पुढाकारातून सोनई येथील तरुणांचे पंढरपूर स्वच्छता अभियान

78
0

आशाताई बच्छाव

IMG-20230703-WA0072.jpg

उदयन गडाख यांच्या पुढाकारातून सोनई येथील तरुणांचे पंढरपूर स्वच्छता अभियान
सोनई प्रतिनिधी. (कारभारी गव्हाणे)
यशवंत सामाजिक प्रतिष्ठान सोनई,आर्ट ऑफ लिव्हिंग, पसायदान आनंदवन व युवा चेतना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या पुढाकारातून सोनई येथील तरुण पंढरपूर येथे स्वच्छता अभियान राबवण्यासाठी बसने रवाना झाले. यावेळी तरुणांसाठी उदयन गडाख यांनी मोफत बसेसचीही व्यवस्था केली एक जुलै रोजी सकाळी हे सर्व युवक मोठ्या उत्साहात बससमोर नारळ वाढवून सकाळी सात वाजता पंढरपूर येथे रवाना झाले.

पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राच्या बाहेरून वारकरी लाखोंच्या संख्येने येत असतात. आषाढी एकादशी झाली की वारकरी हे विठुरायाचे दर्शन घेऊन परतीच्या मार्गावर असताना पंढरपूर येथे तसेच चंद्रभागेच्या तिरी मोठे घाणीचे साम्राज्य होते. यामुळे चंद्रभागेचे पाणी दूषित होऊ नये व पंढरपुरात साचलेल्या कचऱ्यामुळे आरोग्य असे धोका पोहोचू नये म्हणून सोनई येथील तरुण हे पंढरपुराची स्वच्छता करण्यासाठी रवाना झाले. स्वच्छता अभियानासाठी निघालेल्या युवकांनी सांगितले की यावेळी आम्ही मंदिर परिसर, प्रदक्षिणामार्ग व गावातील साफसफाई करणार आहोत. तसेच यामध्ये प्लॅस्टिक पिशव्या , कागदांचा कचरा, द्रोण, ग्लास, केळीच्या साली, कुजलेले अन्न यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते परिणामी रोगराई पसरू नये म्हणून पंढरपूर येथे तरुणांनी स्वच्छता मोहीम राबवली.

यावेळी सरपंच धनंजय वाघ, यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे सदस्य उदयराव पालवे ,संजय गर्जे, सुनील गडाख, प्रसाद हारकाळे,प्रताप येळवंडे, अशोक शेटे, सुधीर दरंदले, दत्ता काळे बल्लू जनवीर, निलेश बानकर यांचेसह यशवंत प्रतिष्ठान, आर्ट ऑफ लिव्हिंग ,युवा चेतना फाऊंडेशनचे अनेक तरुण सदस्य या उपक्रमात सहभागी होणार आहे यावेळी सोनई येथील युवकांनी उदयन गडाख यांनी बसचे नियोजन केल्यामुळे त्यांचे आभार मानले.

Previous articleमुखेड कृषी विभागाकडून कृषी संजीवनी सप्ताह संपन्न..
Next articleआ. रणजीतसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाभार्थी संमेलन उत्साहात
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here