Home गडचिरोली सूर्योदय अभ्यासिकेच्या वतीने श्री संत जगनाडे महाराजांची जयंती साजरी

सूर्योदय अभ्यासिकेच्या वतीने श्री संत जगनाडे महाराजांची जयंती साजरी

39
0

आशाताई बच्छाव

IMG_20231208_194427.jpg

सूर्योदय अभ्यासिकेच्या वतीने श्री संत जगनाडे महाराजांची जयंती साजरी

संत महात्मानी सांगितलेला विज्ञानवाद आत्मसात करा— अनुप कोहळे

गडचिरोली,(सुरज गुंडमवार )::- सूर्योदय अभ्यासिका गडचिरोली च्या वतीने श्री संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करून, त्यांना अभिवादन करण्यात आले.
संत महातम्यांची जयंती फक्त मिरवण्यासाठी नसून जयंतीच्या निमित्ताने त्यांनी सांगितलेले विचार त्यांचे कार्य आत्मसात करून युवकांनी विज्ञानवाद जपला पाहिले, तेव्हा खऱ्या अर्थाने संताचे विचार आणि कार्य आपण येणाऱ्या पिढी पर्यंत पोहचवू शकणार, जाती भेद विसरून युवकांनी सर्वधर्म समभावची भूमिका घेतली पाहिजे असे मत शिवकल्याण संस्था अध्यक्ष अनुप कोहळे यांनी व्यक्त केले, यावेळी ते मार्गदर्शक म्हुणुन बोलत होते.
कार्यक्रमाला सूर्योदय अभ्यासिकेचे संचालक राहुल भांडेकर, अजय सोमनकर, आकाश सोनटक्के, पंकज खोबे, आकाश आमबोरकर, चंदू नैताम, पदम भुरसे, अक्षय भांडेकर, भुषण कुंघाडकर, अक्षय जुवारे, अविनाश सातपुते, देवेंद्र कोठारे, अभय कुकडे, अमोल पोरटे, साहिल चुधिरी, मनीष भांडेकर, निकेश मोहूर्ले, शशिकला मार्गिया, मोनाली वड्डे, वैष्णवी कुळमेथे, आचाल कोठारे, शिवानी मोहुर्ले, चेतन जेंगठे, राहुल मडावी, सुरज कुकडे सह मोठ्या संख्येने अभ्यासिकेतील युवक – युवती यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोषी सूत्रपवार तर आभार गणेश सूत्रपवार यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here