Home जालना शेवली येथील निराधार वृध्द महिलेस बेघर करून तिसऱ्या व्यक्तीने सुरू केले घरकुलाचे...

शेवली येथील निराधार वृध्द महिलेस बेघर करून तिसऱ्या व्यक्तीने सुरू केले घरकुलाचे काम 26 जानेवारीला महिलेने आंदोलन करण्याचा दिला ईशारा

213

आशाताई बच्छाव

IMG_20231208_194805.jpg

शेवली येथील निराधार वृध्द महिलेस बेघर करून
तिसऱ्या व्यक्तीने सुरू केले घरकुलाचे काम
26 जानेवारीला महिलेने आंदोलन करण्याचा दिला ईशारा
ः शेवली येथील निराधार वृध्द महिलेच्या मालकीच्या जाग्याचे बनावट दस्तावेज तयार करून जिवे मारण्याची धमकी देत त्या जागेवर घरकुल बांधकाम करणाऱ्या लोकाविरूध्द कारवाई करून आपली जागा आपल्याला मिळावी अशी आर्तहाक जालना तालुक्यातील शेवली येथील सुगरनबाई उत्तम सिल्लोडे यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे केली.
जालना तालुक्यातील शेवली येथील सुगरनबाई उत्तम सिल्लोडे या निराधार वृध्द महिलेने बालचंद्र कचरू सुकटे यांच्याकडून शेवली ग्रामपंचायत अंतर्गत असलेले प्लॉट नंबर 425 त्याची रूंदी 35 आणि लांबी 50 अशी असून हा प्लॉट सुगरनबाईने 1 लाख 35 हजार रूपयांमध्ये खरेदी केली होती. व त्याठिकाणी सुगरनबाई ही निराधार महिला पत्राचे शेडमध्ये वास्तव्यास होती. मात्र, काही दिवसांपुर्वी सदरील महिलेचे घर गावातल्या लोकांनी जमिनदोस्त करून त्याठिकाणी अनाधिकृतपणे बियरबार सुरू केला होता. मात्र, महिलेने सहा दिवस उपोषण केल्यानंतर प्रशासनाकडून सदरील बियरबार सिल करण्यात आला. मात्र, तद्नंतर तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक आणि तलाठी यांनी गावातील काही धनाडया लोकांशी आर्थीक व्यवहार करून सुगरनबाई सिल्लोडे या निराधार महिलेस कोणीही वारसदार नसल्याची संधी साधुन या महिलेस बेघर करत या महिलेच्या जाग्यावर तिसऱ्याच व्यक्तीने घरकुल मंजुर करून घेतले आणि त्याचे काम ही सुरू केले. वृध्दमहिलेच्या जाग्यावरील अतिक्रमण हटवावे यासाठी सदरील वृध्द महिला गेल्या काही वर्षापासून सेवली ते जालना येथे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय, पंचायत समिती यांच्याकडे न्याय मागण्यासाठी खेटया मारत आहे. मात्र, या महिलेच्या अर्जाची दखल अद्यापही घेण्यात आलेली नाही.

Previous articleसूर्योदय अभ्यासिकेच्या वतीने श्री संत जगनाडे महाराजांची जयंती साजरी
Next articleविकसित भारत संकल्प योजनेअंतर्गत न्यु एम्पायर भारत गॅस नाशिक रोड येथे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना राबविण्यात आली
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.