Home अमरावती पी .आर .पोटे पाटील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना जनावराच्या लसीकरनासंदर्भात केले मार्गदर्शन

पी .आर .पोटे पाटील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना जनावराच्या लसीकरनासंदर्भात केले मार्गदर्शन

112
0

आशाताई बच्छाव

IMG-20220617-WA0007.jpg

पी .आर .पोटे पाटील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना जनावराच्या लसीकरनासंदर्भात केले मार्गदर्शन

युवा मराठा न्यूज (तालुका विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाटील दांदळे)

अमरावती :– डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्नित पी. आर. पोटे पाटील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत नांदगाव पेठ तालुका अमरावती येथील शेतकऱ्यांना जनावरांच्या लसीकरणासंदर्भात मार्गदर्शन केले. कृषिदूत पुर्वेश गायकवाड व योगेश निखाडे यांनी पशुवैद्यकीय अधिकारी नांदगाव येथील डॉ. स्नेहल बनसोड , परिचर रणजित राठोड , डॉ.एस.बी. काळे यांचा मदतीने जनावरांच्या लसीकरणाचे प्रात्यक्षिक • आयोजित केले. यावेळी विद्यार्थी व पशु वैद्यकीय अधिकारी यांनी शेतकऱ्यांमध्ये जनावरांच्या रोगराईसंदर्भात माहिती दिली. महाविद्यालयाचे प्रा.उदय देशमुख, श्रद्धा देशमुख अर्चना बेलसरे. यांचे विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन लाभले. लसीकरण जनजागृती कार्यक्रमाला
सहदेवराव डांगे, रामजी सोसकर ,मधुकरराव कळंबे , चंद्रशेखर सुंदरकर प्रकाश खडसे यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होेते.

Previous articleभारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या अमृत महोत्सव सभा संग्रामपूर येथे संपन्न!
Next articleवैधव्य (विधवा) एक शोध आणि बोध…!!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here