Home नांदेड गजानन माध्यमिक विद्यालय तडखेल ता. देगलूर येथे मानव विकास मिशन अंतर्गत विद्यार्थ्यांना...

गजानन माध्यमिक विद्यालय तडखेल ता. देगलूर येथे मानव विकास मिशन अंतर्गत विद्यार्थ्यांना सायकलीचे वाटप.

132

आशाताई बच्छाव

IMG-20220616-WA0017.jpg

गजानन माध्यमिक विद्यालय तडखेल ता. देगलूर येथे मानव विकास मिशन अंतर्गत विद्यार्थ्यांना सायकलीचे वाटप.

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

देगलुर:-गजानन माध्यमिक विद्यालय तडखेल या शाळेत दिनांक १५-०६-२०२२ रोजी मानव विकास मिशन अंतर्गत माननीय गटविकास अधिकारी श्री शेखर देशमुख तसेच गटशिक्षणाधिकारी श्री जाधव सर पंचायत समिती देगलूर यांच्या हस्ते ३८ मुलींना सायकलीचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना आजचा शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकाचे वाटप करण्यात आले.
गजानन माध्यमिक विद्यालय तडखेल या शाळेत तडखेल तांडा,अल्लापुर, लोणाळ,उंद्री,चोंडी या गावाहून विद्यार्थी शाळेत येत असतात.या गावातून मानव विकास परिवहन मंडळाची बस सेवा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना मानव विकास मिशन अंतर्गत विद्यार्थ्यांना येणे-जाणे करण्याकरिता शासनाकडून सन २०२२ करिता ३८ मुलींना सायकलींचे वाटप करण्यात आले,
यावेळी गटविकास अधिकारी श्री शेखर देशमुख, गटशिक्षणाधिकारी श्री जाधव सर, पांचारे सर,मठपती सर शाळेचे मु.अ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते, सर्वांचे आभार भोसले सरांनी व्यक्त केले.

Previous articleकावळगाव येथे जि.प.शाळेच्या वतीने प्रवेश उत्सव दिन साजरा.
Next articleजिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंद्री (प दे.) केंद्र राजुरा बु. येथे शाळापूर्व तयारी व पालक मेळावा संपन्न.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.