• Home
  • मुखेड तालुक्यातील अंबुलगा बु. येथे शॉर्टसर्किटमुळे घरास आग लागून गृहपयोगी वस्तू जळून खाक..

मुखेड तालुक्यातील अंबुलगा बु. येथे शॉर्टसर्किटमुळे घरास आग लागून गृहपयोगी वस्तू जळून खाक..

मुखेड तालुक्यातील अंबुलगा बु. येथे शॉर्टसर्किटमुळे घरास आग लागून गृहपयोगी वस्तू जळून खाक..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील मौजे अंबुलगा बु. येथील शेतकरी तुकाराम रामचंद्र कलेटवाड यांच्या घरास दिनांक 24 मार्च रोजी सकाळी दहा वाजता शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागून घरातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले त्यात फ्रिज ,कुलर, टीव्ही, पलंग, कपाट, मोबाईल, इत्यादी वस्तूसह तुर पाच क्विंटल, सोयाबीन तीन क्विंटल, हरभरा दोन क्विंटल, ज्वारी चार क्विंटल, गहू एक क्विंटल, तांदूळ एक क्विंटल आदि पोते जळून खाक झाली. व घरात कपाटात असलेली रोख रक्कम सोन्या-चांदीचे दागिने जळून खाक झाली. याचा अंदाजे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकरी तुकाराम रामचंद्र कलेटवाड यांनी सांगितले. याबाबत मिळालेली सविस्तर वृत्त अंबुलगा बु. येथील शेतकरी तुकाराम रामचंद्र कलेटवाड यांच्या कुटुंबातील सर्वजण शेतीच्या कामासाठी सकाळी लवकर शेताकडे गेले होते. मात्र सकाळी दहा वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे त्यांच्या घरात अचानक आग लागली. ही बाब शेजाऱ्यांना व गावकऱ्यांना समजताच त्यांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र संपूर्ण घरच पेटल्याने आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करूनही चार तासाचा वेळ लागला. मात्र तोपर्यंत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते. अंबुलगा सज्जाचे तलाठी वारकरे जे. एस. यांनी घटनास्थळी येऊन झालेल्या घटनेची पाहणी करून पंचनामा केला . संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने सदरील शेतकऱ्याचा निवारा गेला. त्यामुळे राहण्याचा व खाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने आर्थिक संकटात सापडले आहेत. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यास प्रशासनाने तात्काळ मदत जाहीर करून सहकार्य करावे अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

anews Banner

Leave A Comment