Home जळगाव चाळीसगावात शासकीय कार्यालयांमध्ये आता दर सोमवारी नागरीकांना अभिलेख अवलोकनासाठी उपलब्ध करून देणार

चाळीसगावात शासकीय कार्यालयांमध्ये आता दर सोमवारी नागरीकांना अभिलेख अवलोकनासाठी उपलब्ध करून देणार

44
0

आशाताई बच्छाव

IMG-20230930-WA0090.jpg

चाळीसगावात शासकीय कार्यालयांमध्ये आता दर सोमवारी नागरीकांना अभिलेख अवलोकनासाठी उपलब्ध करून देणार
चाळीसगाव,(प्रतिनिधी विजय पाटील)- माहिती अधिकार दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या निर्देश व सुंचनेनुसार चाळीसगाव तहसिल कार्यालयात माहिती अधिकाराची माहिती स्वत:हून माहिती अधिकार अधिनियमान्वये स्वयंप्रेरणेने संकेतस्थळावर प्रकट करण्यांसह माहिती नियमितपणे प्रसिध्द जाहीर करण्यांत येणार आहे. तसेच अधिकाधिक माहिती नागरिकांना उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सर्व शासकीय कार्यालयांत प्रत्येक सोमवारी दुपारी 3 ते 5 या वेळेत माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत विहीत प्रक्रियेनुसारव त्यांच्या मागणीनुसार अभिलेख अवलोकनासाठी उपलब्ध करण्यांत येणार आहे अशी माहिती तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली.गुरूवारी 28 रोजी चाळीसगाव तहसील कार्यालयात माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
कामकाजामध्ये अधिकाधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण करण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयाने माहिती अधिकार अधिनियम 2005 ची माहिती स्वत:हून जाहीर नियोजन करण्यांत येणार आहे. नागरिकांना शासकीय कामकाजाची माहिती सहज व सुलभ पध्दतीने मिळावी यासाठी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 लागू करण्यात आलेला आहे. अधिनियमातील कलम 4 अन्वये नागरिकांना माहितीचा अधिकार मिळणे सोईचे होईल अशा रितीने आणि स्वरुपात सर्व अभिलेख योग्य रितीने सूचिबध्द व नागरिकांना माहिती सुलभतेने मिळण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उपाययोजना नियोजन करण्यांत येत आहे.माहिती अधिकार अधिनियम कलम 4 (1) (ख) नुसार प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने प्रसिध्द करावयाच्या विहीत केलेल्या 17 बाबी प्रसिध्द करणेत येवून तसेच वेळोवेळी अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यासह या बाबीची अंमलबजावणी केल्यानंतर बहुतांश माहिती जनतेसाठी उपलब्ध होईल.
माहिती अधिकार अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी तालुका, मंडळ, गाव पातळीवरील विविध शासकीय कार्यालयात होणार असल्याने याकडे विभागप्रमुख, कार्यालयप्रमुख यांनी कटाक्षाने लक्ष द्यावे. असे निर्देशही सर्व क्षेत्रिय अधिकारी यांना देण्यांत आले आहेत. नागरीकांनी माहितीच्या अधिकाराचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रथम अपिल अधिकारी तथा तहसिलदार प्रशांत पाटील व जन माहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार जितेंद्र धनराळे यांनी आवाहन केले आहे. यावेळी प्रंलबित जनमाहितीचे सर्व अर्जदार तसेच या दिनानिमीत्त आलेले सर्व नागरिकांना उपलब्ध करुन देण्यांत आले व त्यांचे समस्याचे निकारण करण्यांत आले.हा दिन साजरा करतांना तहसिल कार्यालयातील सर्व सहाय्यक जन माहिती अधिकारी व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleवारकरी मंच येवला तालुका महिला कार्यकारणी जाहीर
Next articleव्हॉटसअपवर व्हिडीआचे स्टेट ठेवल्याच्या कारणातून एकास मारहाण-पाच जणांच्या विरोधात गुन्हा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here