• Home
  • शहिद जवान कै. संग्राम पाटील यांच्या स्वप्नपूर्तीसाठी डी. वाय. पाटील ग्रुपतर्फे ३ लाखांची मदत

शहिद जवान कै. संग्राम पाटील यांच्या स्वप्नपूर्तीसाठी डी. वाय. पाटील ग्रुपतर्फे ३ लाखांची मदत

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201207-WA0002.jpg

शहिद जवान कै. संग्राम पाटील यांच्या स्वप्नपूर्तीसाठी डी. वाय. पाटील ग्रुपतर्फे ३ लाखांची मदत

कोल्हापूर : करविर तालुक्यातील निगवे खालसा गावचे सुपुत्र शहिद जवान संग्राम पाटील हे जम्मू-काश्मीर मध्ये भारतमातेच्या रक्षणासाठी लढताना काही दिवसांपूर्वी वीरगती प्राप्त झाली.
शहीद जवान कै. संग्राम पाटील यांच्या घराचे बांधकाम सुरू होते ते शहीद झाल्याने त्यांच्या अपुऱ्या घराच्या स्वप्नपूर्तीसाठी आज पद्मश्री डाँ. डी. वाय. पाटील ग्रुपतर्फे ३ लाख रूपयाचा धनादेश शहिद संग्राम पाटील यांच्या विर पत्नीकंडे सोपविला. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.सतेज पाटील यांचे पुतणे व पद्मश्री.डाँ.डि.वाय.पाटील यांचे नातू  कोल्हापूर दक्षिण चे मा.श्री. आमदार पाटील यांनी शहिद पाटील यांच्या लहान मुलाला आपल्या जवळ घेऊन इतक्या लहान वयात ज्याला अजून बाबाच प्रेम, माया , काहीच मिळाले नसुन त्या चिमुरड्याचे दुःख सहन न झाल्याने आमदार पाटील यांच्या डोळ्यात अश्रू दिसत होते.
यावेळी आमदार पाटील म्हणाले शहीद पाटील कुटुंबीयांच्या पाठीशी संपूर्ण कोल्हापूर उभे आहेत त्यानी कसलीही काळजी करण्याची गरज नाही , तसेच आमचे डाँ.डि.वाय.पाटील ग्रूप खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आहोत असे यावेळी बोलत होते.
याप्रसंगी करवीरचे माजी. उपसभापती सागर पाटील , अशोक किल्लेदार, टी.वाय.पाटील , शाहजी किल्लेदार, पी.एम.पाटील, एल.एस.किल्लेदार , जी.जी.पाटील , विलास कांजर , प्रवीण पाटील , संतोष किल्लेदार , संतोष ऱ्हाटोड , राहुल पाटील , संजय गुरव , गजानन पाटील , एकनाथ पाटील , डी.एस.ढगे आदी उपस्थित होते.

कोल्हापूर युवा मराठा न्यूज नेटवर्क .

anews Banner

Leave A Comment