Home जालना बदनापूर येथील कार्यकर्त्यांचा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या हस्ते भाजपा मध्ये...

बदनापूर येथील कार्यकर्त्यांचा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या हस्ते भाजपा मध्ये जाहीर प्रवेश

15
0

Yuva maratha news

1000315218.jpg

 

बदनापूर येथील कार्यकर्त्यांचा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या हस्ते भाजपा मध्ये जाहीर प्रवेश

जालना ( दिलीप बोंडे ब्युरो चीफ) केंद्रीय मंत्री ना. रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते व आ. संतोष पाटील दानवे, आ. नारायण कुचे, भाजपा जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, जालना विधानसभा प्रमुख भास्कर (आबा) दानवे यांच्या उपस्थितीत बदनापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी भाजपा मध्ये जाहीर प्रवेश केला.

पक्ष प्रवेश करणाऱ्यांमध्ये खादगाव ता. बदनापूर येथील राष्ट्रवादी गटाचे जेष्ठ नेते तथा समाजसेवक परमेश्वर नाईकवाडे, गेवराई बाजार येथील माजी सरपंच संतोष जोशी यांनी प्रवेश केला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे यांनी सर्वांचे स्वागत करुन पुढील पक्ष संघटन कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

जालना लोकसभा मतदारसंघावर पुन्हा एकदा भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. रावसाहेब पाटील दानवे यांना सहाव्यांदा लाखोंच्या मताधिक्याने निवडून देण्यासाठी आम्ही अथक प्रयत्न करू असे आश्वासन यावेळी सर्वांनी दिले.

 

 

Previous articleपिंपळगाव रेणुकाई परिसरात वन विभागाच्या आशीर्वादाने अवैध वृक्षतोड जोमात कारवाईची मागणी
Next articleअ.भा.अग्रवाल सम्मेलनतर्फे पिण्याच्या पाण्याची टँकरव्दारे व्यवस्था!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here