Home जालना पिंपळगाव रेणुकाई परिसरात वन विभागाच्या आशीर्वादाने अवैध वृक्षतोड जोमात कारवाईची मागणी

पिंपळगाव रेणुकाई परिसरात वन विभागाच्या आशीर्वादाने अवैध वृक्षतोड जोमात कारवाईची मागणी

69
0

Yuva maratha news

1000315203.jpg

पिंपळगाव रेणुकाई परिसरात वन विभागाच्या आशीर्वादाने अवैध वृक्षतोड जोमात
कारवाईची मागणी

जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
याविषयी सविस्तर माहिती अशी की , पिंपळगाव रेणुकाई पारध यासह संपूर्ण भोकरदन तालुक्यामध्ये वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अवैध वृक्षतोड जोरात सुरू असून वृक्षतोड करणाऱ्यांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडूनच अभय मिळत असल्याचे अवैध वृक्षतोड व्यापाऱ्यांकडून बोलले जात आहे. आम्ही वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पैसे देतो व त्यांना मॅनेज करतो आमचे कोणी काहीही वाकडे करू शकत नसल्याची प्रतिक्रिया लाकूडतोड्यांनी दिली आहे. अशा वृक्षतोड करणाऱ्या लाकूड तोडे तसेच त्यांना मदत करणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह वृक्षतोड करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई सोबत वृक्ष तोडणाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे प्रदेशकार्यध्यक्ष श्री वसंतराव देशमुख यांच्यासह अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे भोकरदन तालुकाध्यक्ष श्री बाळासाहेब देशमुख यांनी केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात कुऱ्हाड बंदीचा कायदा असतांनाही वृक्षतोड कशी होते हा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. संबंधित वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी केवळ पैशासाठी काम करत असून पाट्या टाकण्याचेच काम करत असल्याचा आरोप श्री वसंतराव देशमुख यांनी केला आहे. देशात ‘झाडे लावा झाडे वाचवा ‘या शासनाच्या ब्रिद वाक्यास या विभागाच्या अधिकाऱ्यांनी हरताळ फासला आहे.शासन वृक्षारोपण करण्यासाठी वर्षाकाठी करोडो रुपये खर्च करून वृक्षलागवड करण्यात येते परंतु लागवड केलेल्या वृक्षांपैकी १०% ते २०%झाडं जिवंत असल्याचे कुठेही दिसत नाही.दरवर्षी एकच खड्डा निधी मात्र दरवर्षी नवीन असा गोरखधंदा राजरोसपणे सुरू आहे त्यामुळे नवीन वृक्षांची संख्या वाढतांना दिसत नाही.याऊलट पुर्वीच्याच वृक्षांची वृक्षतोड करण्यास वनविभागाकडून प्रोत्साहन दिले जात आहे.या भ्रष्ट वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळे जंगलात वृक्षतोड जोरात सुरू असून जंगलं उजाड झाली आहेत.आणि याचे परिणाम सर्वच जनतेला भोगावे लागत आहेत.जसे की,वेळेवर पाऊस न पडणे,उन्हाची तीव्रता वाढणे, उष्णता जास्त प्रमाणात वाढणे, निसर्गाचा समतोल बिघडणे, जमिनीची धूप वाढणे एकुणच पर्जन्यमानावर या वृक्षतोडीमुळे विपरीत परिणाम झाला आहे.याला वनविभागाचे अधिकारी कर्मचारी जबाबदार आहेत यात कुठलीही शंका नाही.अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई का करण्यात येऊ नये असा सवालही यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे प्रदेशकार्याध्यक्ष श्री वसंतराव देशमुख यांनी उपस्थित केला आहे.
संबंधित वन विभागाची झाडाझडती सरकार केंव्हा घेणार आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई कधी करणार? अवैध वृक्षतोड करणाऱ्या गुन्हेगारांवर लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा वनविभागाच्या विरोधात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने तिव्र आंदोलन उभे करण्यात येणार असल्याचा इशारा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे प्रदेशकार्याध्यक्ष श्री वसंतराव देशमुख यांनी संबंधित विभागाला दिला आहे.यासोबतच वृक्षारोपण ही एक लोकचळवळ उभी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

Previous articleसंस्कार शिबिर म्हणजे राष्ट्र निर्मितीची संकल्पना – देवचंद चौधरी
Next articleबदनापूर येथील कार्यकर्त्यांचा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या हस्ते भाजपा मध्ये जाहीर प्रवेश
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here