Home अमरावती कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्याकडून कोविड योद्धा प्रमाणपत्राची होळी; शासन आपल्या दारी’उपक्रम होऊ देणार...

कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्याकडून कोविड योद्धा प्रमाणपत्राची होळी; शासन आपल्या दारी’उपक्रम होऊ देणार नसल्याचा इशारा.

47
0

आशाताई बच्छाव

IMG_20231119_061824.jpg

कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्याकडून कोविड योद्धा प्रमाणपत्राची होळी; शासन आपल्या दारी’उपक्रम होऊ देणार नसल्याचा इशारा.
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.

शासकीय आरोग्य सेवेत कायमचे समायोजन करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील कंत्राटी आरोग्य अधिकारी, कर्मचारी २५ ऑक्टोंबर पासून बेमुदत काम बंद संपावर आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांनी शनिवारी कोरोना काळात शासनाकडून देण्यात आलेल्या कोविड योद्धा प्रमाणपत्राची होळी करीत शासनाचा निषेध केला. शासनाने संपाची दखल न घेतल्याने कर्मचाऱ्यांमधील रोज दिवसेंदिवस वाढत आहे. सायन्स कोर मैदान अमरावती येथे 26 नोव्हेंबर ला होणाऱ्या’शासन आपल्या दारी’उपक्रमालाही घेरावा घालून हा उपक्रम बंद पाडण्याचा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला आहे. शासकीय आरोग्य सेवेत कायमचे समायोजन करण्याचा मागणीसाठी राज्यभरातील कंत्राटी आरोग्य अधिकारी, कर्मचारी २५ ऑक्टोंबर २०२३ पासून बेमुदत काम बंद संपावर आहेत परंतु, शासन दरबारी या आंदोलनाची कोणत्याही प्रकारची दखल सरकार घेत नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता संपतील कर्मचाऱ्यांनी शासनाने संपाची दखल घ्यावी यासाठी विविध प्रकारे लक्षविधी आंदोलनाला सुरुवात केली आहे. कोरोना काळात जेव्हा रुग्णांना हात लावायला कोणी नातेवाईकही तयार होत नव्हते तेव्हा याच कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र सेवा देत रुग्णांची सेवा केली होती. त्यांच्या या सेवेबद्दल शासनाच्या वतीने या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा गौरव करीत त्यांना कोविड योद्धा म्हणून त्यांच्या सेवेबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरविले होते. परंतु, आता कर्मचारी हे आपल्या अधिकारासाठी २५ दिवसापासून आंदोलन करूनही शासन याची दखल घेत नसल्याने शासनाविरोधातील रोष व्यक्त करण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी त्यांना देण्यात आलेल्या प्रमाणपत्राची होळी केली. जर सरकार आंदोलनाची दखल घेत नसेल तर शासन आपल्या दारी उपक्रमानंतर गत आयोजित कार्यक्रम बंद पाडण्याचा इशारा संपात असलेल्या सहभागी कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here