Home जालना मराठा आंदोलन मनोज जरंगे पाटील यांच्या जाहीर सभेच्या पूर्वतयारीची बैठक जालन्यात संपन्न….

मराठा आंदोलन मनोज जरंगे पाटील यांच्या जाहीर सभेच्या पूर्वतयारीची बैठक जालन्यात संपन्न….

77
0

आशाताई बच्छाव

IMG_20231119_062310.jpg

मराठा आंदोलन मनोज जरंगे पाटील यांच्या जाहीर सभेच्या पूर्वतयारीची बैठक जालन्यात संपन्न….

एक डिसेंबरला जालन्यात मनोज जरांगे यांच्या जाहीर सभेचे आयोजन…

बैठकीस जिल्ह्यातील आठही तालुक्यातील स्वयंसेवक व समन्वयकांचा सहभाग…

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांना बैठकीत भाषण करण्यास समाज बांधवांचा विरोध, विरुद्ध समाज बांधवांनी केली जोरदार घोषणाबाजी…

अखेर भास्कर दानवेंना बैठक स्थलापासून घ्यावा लागला काढता पाय…

जालना,(दिलीप बोंडे जिल्हा प्रतिनिधी)

मराठा आंदोलक आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभेचे आयोजन जालन्यात करण्यात आले आहे. 1 डिसेंबर रोजी जालन्यात रॅली काढून मनोज जरांगे यांची जाहीर सभा होणार असून मनोज जरांगे मराठा समाज बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत. त्या सभेच्या पूर्वनियोजनासाठी जालन्यात आज सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा ची एकत्रित बैठक पार पडली. या बैठकीस जिल्ह्यातील जालना, अंबड, घनसावंगी, भोकरदन, जाफराबाद, मंठा, बदनापूर आणि परतुर या आठही तालुक्यातील स्वयंसेवक आणि समन्वयकांनी उपस्थित राहून मनोज यांची जाहीर सभा यशस्वी करण्यासंदर्भात चर्चा केली. दरम्यान या बैठकीत मराठा स्वयंसेवकांनी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांना भाषण करण्यास विरोध करत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काल अंबड शहरात ओबीसी समाजाची एल्गार सभा घेण्यात आली. या सभेसाठी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह त्यांचे बंधू समीर भुजबळ देखील उपस्थित होते. यावेळी छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात मनोज जरंगे यांना कडाडून विरोध केला होता. व काल सभेसाठी भास्कर दानवे आणि समीर भुजबळ यांचे सोबत चे फोटो समाज माध्यमांवर वायरल झाले होते. एकीकडे भास्कर दानवे ओबीसी समाजाच्या सभांना जातात आणि तिथे जाऊन मराठा समाजाला विरोध करणाऱ्यांना पाठिंबा देतात, इतकच नाही तर आधी विरोध करतात हे स्पष्ट झाले आहे

Previous articleकंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्याकडून कोविड योद्धा प्रमाणपत्राची होळी; शासन आपल्या दारी’उपक्रम होऊ देणार नसल्याचा इशारा.
Next articleम्हसदीत गणू महाराज यांचा सत्कार संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here