Home पुणे मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही पुण्यातील आंदोलन सुरूच 🛑

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही पुण्यातील आंदोलन सुरूच 🛑

102
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही पुण्यातील आंदोलन सुरूच 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची येत्या रविवारी (दि. 14) होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याच्या निषेधार्थ पुण्यात परीक्षार्थीनी आंदोलन केले. या आंदोलनाचे पडसाद औरंगाबाद, नाशिक, नांदेड इ. ठिकाणी उमटले. यात राजकीय पक्षांनी सहभाग घेत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या आठवडाभरात ही परीक्षा होईल व त्याची तारीख आज (शुक्रवारी) जाहीर होईल, असे फेसबुकवरील संवादातून सांगूनही रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरूच होते. या पार्श्वभूमीवर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

एमपीएससीने परिपत्रक काढत राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असून, अनेक जिल्ह्यांत निर्बंध आले आहेत. अशा काळात परीक्षा घेणे योग्य नाही, असे आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाचे पत्र 10 मार्चला एमपीएससीला मिळाले. या सूचनेनुसार परीक्षा पुढे ढकलली जात असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. गेल्या वर्षभरापासून राज्यसेवा पूर्व परीक्षा वारंवार पुढे ढकलली जात आहे. 14 मार्च रोजी होणारी ही परीक्षा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने पुन्हा एकदा पुढे ढकलली. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे परीक्षार्थीनी तीव्र संताप व्यक्त केला. पुण्यात परीक्षार्थी रस्त्यावर उतरत त्यांनी मध्यवर्ती भागातील रस्ता बंद केला. एमपीएससीची परीक्षा नियोजित वेळेत झालीच पाहिजे, अधिवेशन आणि निवडणुका घेता येतात मग परीक्षा का नाही, असा सवाल उपस्थित करत राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला.

भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी एमपीएससीची परीक्षा नियोजित वेळेत झालीच पाहिजे, अशी मागणी करत परीक्षार्थींच्या आंदोलनात सहभागी झाले. सरकारकडून दडपशाही सुरु असून जोपर्यंत परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मागे घेतला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहील असा इशारा आमदार पडळकर यांनी दिला.

पडळकर म्हणाले, 36 जिल्ह्यातील जवळपास 1 लाख विद्यार्थी पुण्यात एमपीएससीचा अभ्यास करत आहेत. त्यातील अनेक विद्यार्थी गरीब असून शेतकर्‍यांची आणि कष्टकर्‍यांची आहेत. परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांना दरमहा 9 ते 1ा0 हजार रुपये खर्च येतो. परीक्षा वारंवार रद्द केल्याने परीक्षार्थींची मोठी अडचण होत आहे.

परीक्षा तीन दिवसांवर आली असताना अचानक असा निर्णय घेणे अयोग्य आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. तसेच वयोमर्यादेमुळे काहींचे वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे.

अश्विनी खरात, विद्यार्थीनी
दोन वेळा प्रवेशपत्र येऊनही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. आम्ही परीक्षेची तयारी करतो आणि ऐनवेळी परीक्षा पुढे ढकलली जाते. त्यामुळे उमेदवारांचे मानसिक खच्चीकरण होते. वर्षभरात युपीएससी, रेल्वे भरतीच्या परीक्षा झाल्या.

राज्यात गेल्या आठवड्यात आरोग्य सेवेतील भरतीची परीक्षा झाली. मग एमपीएससीच्याच परीक्षा का पुढे ढकलल्या जात आहेत…⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here