• Home
  • ब्रूस लीचा मृत्यू : आजदेखील न सुटलेले कोडे, वाचा त्याविषयीची धक्कादायक माहिती🛑

ब्रूस लीचा मृत्यू : आजदेखील न सुटलेले कोडे, वाचा त्याविषयीची धक्कादायक माहिती🛑

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210313-WA0007.jpg

🛑 ब्रूस लीचा मृत्यू : आजदेखील न सुटलेले कोडे, वाचा त्याविषयीची धक्कादायक माहिती🛑
✍️ मनोरंजन 🙁 विलास पवार पुणे प्रतिनिधी युवा मराठा )

✍️ माणसाचा मृत्यू होणे ही तर नैसर्गिक गोष्ट! पण कधी कधी हा मृत्यू आपल्या भोवती रहस्याचे इतके दाट जाळे विणतो की ते सुटण्याचे नावच घेत नाही.

सामान्य माणसाचं सोडा त्याचा मृत्यू कसा झाला याची कोणालाही चिंता नसते. पण त्याच्या जागी समजातील एखादी प्रसिद्ध व्यक्ती असेल, तर मात्र त्या व्यक्तीचा मृत्यू म्हणजे एक चर्चा बनून जाते. जी त्यानंतर निरंतर सुरू असते.
ब्रूस ली याच्या आकस्मिक मृत्यूमुळे सर्वानाच धक्का बसला होता.
त्याच्या पोस्टमोर्टमच्या रिपोर्टमध्ये नमूद केले होते की त्याला Celebral Edema नावाचा आजार झाला होता, ज्यामध्ये मेंदूला सूज येते.
Wikipedia मधील उल्लेखानुसार १९७३ साली Enter The Dragon नावाच्या फिल्मचे चित्रीकरण करत असताना ब्रूस ली याचा मृत्यू झाला. तेव्हा तो गोल्डन हार्वेस्ट स्टुडीयोमध्ये चित्रीकरण करत होता. चित्रीकरण सुरु असताना अचानक त्याला चक्कर आली आणि तो बेशुद्ध झाला.
हॉस्पिटलला घेऊन जाता जाता त्याने प्राण सोडला.

2) पण सर्वात विवादात्मक कहाणी काहीतरी वेगळीच आहे.
*यानुसार ब्रूस ली ने एका अमेरिकन महिलेशी लग्न केले होते. त्यांना दोन मुलेही होती. जेव्हा ब्रूस लीचा मृत्यू झाला तेव्हा त्याचे मृत शरीर त्याच्या अमेरिकन बायकोच्या खोलीत सापडले.*
अनेकांनी असाही तर्क लावला की ब्रूस ली याला त्याच्या बायकोनेच विष देऊन संपवले होते. पण पोलीस खात्यातील नोंदीनुसार तर ब्रूस ली याचा मृत्यू हा आकस्मिक कारणामुळे झाला होता.
या गोष्टीला विरोध करणाऱ्या गटाचे म्हणणे आहे की, ब्रूस लीच्या चाहत्यांनी शांत राहावे म्हणून पोलिसांनी मुद्दाम खोटी गोष्ट सांगितली. कारण आपला सगळ्यांचा लाडका ब्रूस ली याची हत्या झाली आहे हे ऐकून त्याचे चाहते खवळले असते आणि परिस्थिती हाताबाहेर गेली असती.

आता या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे ते देवच जाणो!

3)आणखी एक विचित्र (हास्यास्पद) दावा केला गेला की अमेरिकेला चीनच्या या सेलिब्रिटीचे जगभरातील वाढते महत्त्व बघवत नव्हते म्हणून त्यांनी आपल्या एजंटच्या माध्यमातून ब्रूस लीचा काटा काढला आणि ही अमेरिकन एजंट दुसरी तिसरी कोणी नसून त्याची अमेरीकन बायकोच होती.

ब्रूस ली याला हळूहळू विष देण्यात आले होते त्यामुळे त्याच्या शरीरातील विषाचा अंश सापडू शकला नाही असेही कित्येकांचे म्हणणे आहे…!

या सर्व दाव्यांमध्ये कथांमध्ये किती तथ्य आहे याचा शोध आजही सुरु आहे.

परंतु अवघ्या ३२ व्या वर्षी मृत्यू पाहाव्या लागणाऱ्या या जगभरातील चाहत्यांच्या या लाडक्या मार्शल आर्टिस्टचा मृत्यू हा मनाला चटका लावणारा ठरला…⭕

anews Banner

Leave A Comment