Home माझं गाव माझं गा-हाणं पिंपळगाव ब मध्ये भर दिवसा मारहाण करून 10 लाखांची लूट पिंपळगाव बसवंत...

पिंपळगाव ब मध्ये भर दिवसा मारहाण करून 10 लाखांची लूट पिंपळगाव बसवंत येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

912
0

राजेंद्र पाटील राऊत

पिंपळगाव ब मध्ये भर दिवसा मारहाण करून 10 लाखांची लूट
पिंपळगाव बसवंत येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
निफाड -सागर कटाळे युवा मराठा न्यूज चॅनेल निफाड तालुका प्रतिनिधी पिंपळगाव बसवंत:-काही दिवसांपासून पिंपळगाव बसवंत शहरात चोरी दरोडा,हाणामारी या सारखे प्रकार वाढले असून पोलिसांनी याकडे लक्षन दिल्याने व्यापारी वर्गावर हल्ला झाल्याची घटना दि.३० रोजी दिवसा घडली असून,१० लाख रुपयांची लूट झाली आहे. याबाबत पिंपळगाव बसवंत येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. असून व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.याबाबत माहिती अशी की पिंपळगाव बसवंत जोपुळ बाजार समितीच्या रस्त्याने समृद्धी आडतचे व्यापारी सन्मान गायकवाड यांच्या आडतला कॅशर म्हणून काम करत असलेले संजय कापसे वय ४६ राहणार रानवड हे दि.३०रोजी दुपारी 12:30 ते 1 वाजेच्या दरम्यान १० लाख रुपये घेऊन बाजार समिती कडे जात असताना त्यांच्यावर पाळत ठेवलेल्या अज्ञात मोटार सायकलहून आलेल्या दोघा चोरट्यानी त्यांची गाडी थांबवून त्यांच्यावर लाकडी दांड्याने मारहाण केली. त्यांच्या जवळ असलेली पैशाची पिशवी घेऊन पळवल्याचे घटना घडली.
याबत पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस अधीक्षक सचिन पाटील,अतिरिक्त पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे करत आहे.बँकेतून रक्कम काढताना तसेच रक्कम घेऊन जात असताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे,शक्यतो मोठी रक्कम आर.टी.जी.एस करावी तसेच ज्या ठिकाणी व्यापारी संकुल,बँक परिसर आणि गर्दीचे ठिकाण आहेत त्या सर्वच परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे गरजेचे आहे.पिंपळगाव शहरात जो लुटीचा प्रकार घडला त्यादिशेने पोलीस सखोल चौकशी करत आहे.
-सचिन पाटील
पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण

Previous articleदुर्दैवी मृत्यू लासलगावला एसटी चालकास चिरडले कंटेनरने
Next articleकोरोनाच्या काळात आर्थिक कोंडी असताना, रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांची लूट सुरू…!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here