राजेंद्र पाटील राऊत
दुर्दैवी मृत्यू लासलगावला एसटी चालकास चिरडले कंटेनरने
निफाड(लासलगाव): सागर कटाळे युवा मराठा न्यूज चॅनेल निफाड तालुका प्रतिनिधी- (दि.30) लासलगाव आगाराच्या लासलगाव ते तुळजापूर बस क्र. एम एच १४/ ३६४१ ही बस आज सकाळी लासलगाव बस आगारात प्रवेश घेत असताना कंटेनर क्र. एम एच ४३ वाय ७४६३ ने धक्का दिल्याने बसचा चालक एस. पी. निकम यांनी खाली उतरुन पाहणी करीत असताना घाबरलेल्या कंटेनर चालकाने गाडी तशीच पुढे काढत एसटीचालकास फरफटत नेले. यामुळे एसटी चालकाचे देहाचे तुकडे तुकडे होऊन रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. या दुर्दैवी अपघातात चालक एस. पी. निकम यांना ऐन दिवाळीच्या सणात आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे लासलगावकर सुन्न झाले. संतप्त बसचालक व वाहक तसेच लासलगाव बस आगारातील कर्मचारी संतप्त झाले आणि या घटनेमुळे काही काळ बससेवा बंद पडली.नाशिक येथून बसचालक एस. पी. निकम हे लासलगाव येथे आले. सकाळी बस स्थानकावर चालक एस. पी. निकम यांनी लासलगाव बस आगाराचे व्यवस्थापक समर्थ शेळके व राजेंद्र दारके यांचेसह चहा घेतला व बस आगारातून बस घेऊन रस्त्याने बस स्थानकात आत घेत असताना बसला कंटेनरने धक्का दिल्याने अपघात झाला. मात्र अपघातानंतर हा कंटेनर चालक भरधाव वेगाने बस स्थानक ते गुंजाळ पेट्रोलपंपासमोर एका स्कूटी गाडीला धडक देत हा कंटेनर थांबला. या अपघातात चालक निकम यांच्या मृतदेहाचा रस्त्यावर अक्षरशः रक्ताचा सडा पडला होता. ही घटना समजताच लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ हे कर्मचाऱ्यांसह दाखल झाले व चालक निकम यांच्या मृतदेहाचे तुकडे गोळा करून अॅम्ब्ल्युन्समध्ये टाकले व रस्ता पाण्याने धूवून घेतला.
पगार व इतर मागण्यासाठी एसटी बसचालक, वाहकांचा संप सुरु होता. तो मिटून कालच बससेवा सुरु झाली. आज बस कर्मचारी पुन्हा संप करण्याच्या मानसिकतेत होते. परंतु दिवाळीमुळे बससेवा सुरू करा, असे आवाहन एस.टी, कर्मचारी नेत्यांसह लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ व बस आगार प्रमुख समर्थ शेळके यांच्या दरम्यान झालेल्या चर्चेत करण्यात आले. त्यानुसार आज सकाळी सहा वाजेपासून बसेस सुरु होत नाही तोच ही दुर्घटना घडली.त्यामुळे एसटी कर्मचारी संतप्त झाले आणि त्या चालकाच्या अपघाती मृत्यूबद्दल जोरदार टीका केली. नंतर लगेच पोलीस निरीक्षक राहुल वाघ सहकाऱ्यांसमवेत दाखल झाले. त्यांनी संपाच्या मानसिकतेत असलेल्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. मात्र कर्मचाऱ्याची नाराजी कायम होती.
या घटनेचे वृत्त समजताच राज्य परिवहन मंडळ नाशिक विभाग प्रभारी नियंत्रक मुकुंद कुंवर, विभागीय अधिकारी कैलास पाटील, सुरक्षा अधिकारी अजित भारती व कामगार अधिकारी शेख हे लासलगावी दाखल झाले आहेत. दरम्यान लासलगावमध्ये या अपघाताचे वृत्त समजताच ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली.




