Home नांदेड रेशन दुकानातून डाळ, साखर गायब;गरिबांची दिवाळी गोड कशी होणार?

रेशन दुकानातून डाळ, साखर गायब;गरिबांची दिवाळी गोड कशी होणार?

368
0

राजेंद्र पाटील राऊत

रेशन दुकानातून डाळ, साखर गायब;गरिबांची दिवाळी गोड कशी होणार?

दिवाळी फक्त गहू तांदळावर साजरी करण्याची वेळ

मुखेड -(ता. प्रतिनिधी)

मुखेड तालुक्यातील गेल्या काही वर्षापर्यंत शासनाकडून रेशन हरभरा, डाळ, साखर, पाम तेल दिले जायचे. यामुळे अनेक गोरगरिबांची दिवाळी गोड व्हायची; पण आता शासनाकडून केवळ गहू आणि तांदूळ दिले जातो. गेल्या एक दोन महिन्यापासून केवळ अंत्योदय कार्डधारकांना मोफत गहू तांदळा बरोबरच एक किलो साखर देखील दिली जात आहे. सध्या रेशनिंग दुकानातून डाळ, साखर, पाम तेल गायब झाल्याने गोरगरिबांची दिवाळी गोड कशी होणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दिवाळी सन झाला की श्रीमंत आतापासून गरीब सर्वांनाच गोड-धोड आणि खरीदीचे वेध लागतात; पण दिवाळी काही दिवसानंतर आली असताना रेशन दुकानातून डाळ गायब झाली असून साखर देखील फक्त अंत्योदया लाभार्थ्यांनाच दिली जात आहे.

सध्या रेशन वर कोणाला काय मिळतेय?
१) अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना सध्या 25 किलो गहू, 10 किलो तांदूळ आणि 1 किलो साखर मोफत दिली जाते,
२) प्राधान्य कुटुंबातील रेशन कार्डधारकांना कुटुंबातील प्रतिव्यक्ती मागे 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ मोफत वाटप केले जाते,
३) एपीएल (केशरी) रेशन कार्डधारकांना नियमित धान्य वाटप केले जात नाही; पण शासनाकडून आलेले धान्य वाटप करा तरच धान्य वाटप केले जाते.

दिवाळी साजरी करायची कशी?
शासनाकडून रेशनिंग वर हरभरा डाळ, साखर, पामतेल दिली जात होते; पण आता हे सर्व बंद झाल्याने गोरगरिबांनी दिवाळी कशी साजरी करायची, किमान दिवाळीत हरभरा डाळ, साखर, पाम तेल पुन्हा सुरू करा, दिवाळी तोंडावर आली; पण रेशनवर साखर, हरभरा डाळ काही आली नाही. ती वेळेवर मिळाली, तर आमची दिवाळी गोड होईल.- गृहिणी

शासनाकडून अध्यापक गहू-तांदूळ सोडून दुसरे काहीच नाही शासनाकडून रेशनिंग वर वाटप करण्यासाठी सध्या केवळ गहू आणि तांदूळ आले आहेत. शासनाकडून मिळेल ते धान्य आदेशानुसार वाटप केले जाते. गेल्या एक दोन महिन्यापासून अंत्योदय कार्डधारकांना एक किलो साखर वाटप केली जाते. दिवाळीसाठी डाळ व अन्य काही आल्यास वाटप केले जाईल.

पुरवठा अधिकारी- पदमावार साहेब

Previous articleसाप्ताहिक कोल्हापूर विशेष ” दिवाळी अंकाचे युवा मराठा न्युज मुंबई कार्यालयात प्रकाशन सोहळा 🛑
Next articleदुर्दैवी मृत्यू लासलगावला एसटी चालकास चिरडले कंटेनरने
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here