Home भंडारा अड्याळ येथील अशोक मोहरकर महाविद्यालयात संविधान जागृती कार्यक्रम

अड्याळ येथील अशोक मोहरकर महाविद्यालयात संविधान जागृती कार्यक्रम

97

आशाताई बच्छाव

IMG_20240304_071219.jpg

अड्याळ येथील अशोक मोहरकर महाविद्यालयात संविधान जागृती कार्यक्रम

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) डॉ आंबेडकर फाउंडेशन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन आणि विचारधारा विभाग नागपूर व अशोक मोहरकर कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अशोक मोहरकर महाविद्यालय अडयाळ येथे संविधान जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
याप्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाची प्राचार्य डॉ. राजू ढबाले हे होते प्रमुख वक्ता म्हणून डॉ.लालचंद रामटेके व प्रा. खुशाल फुलझेले प्रामुख्याने उपस्थित होते.
या प्रसंगी डॉ.लालचंद रामटेके यांनी संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांविषयी जागृत रहावे तसेच समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मानवीमुल्यांचे जतन करावे असे आव्हान केले .प्रा. खुशाल फुलझेले यांनी उद्देश पत्रिका कर्तव्य व अधिकार सांगून लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकांने संविधानाचे महत्व समजावून देणे गरजेचे असे सांगितले प्राचार्य डॉ. राजू ढबाले यांनी संविधानाने बहुजन समाजातील लोकांना शिक्षण, समानता,भाषण स्वातंत्र्य, समान काम समान वेतन, स्त्री पुरुष समानतेचे तत्त्व स्वीकारून आत्मसन्मान भारतीय संविधानाने बहाल केले असा महत्वपूर्ण संदेश विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. किशोर हुकरे व आभार डॉ. श्रीकृष्ण भुरे यांनी मानले यशस्वीरीतेसाठी विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Previous articleपांडुरंग सखाराम कदम मुंबई रुग्णालय सेवानिवृत्त कर्मचारी यांचे दुःखद निधन
Next articleराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम शुभारंभ
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.