Home भंडारा राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम शुभारंभ

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम शुभारंभ

105

आशाताई बच्छाव

IMG_20240304_071458.jpg

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम शुभारंभ

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्राथमिक )आरोग्य केंद्र पहेला येथे ३/३/२०२४ ला सकाळी ७.०० वाजता पासुन राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची सुरवात या मोहिमेस शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य सौं.कविताताई जगदीशजी उइके यांच्या हस्ते बालकांना पोलिओ डोस दिला.त्यामुळे या परिसरात उत्साहात लसीकरणाला प्रारंभ झाला.
प्रत्येक पालकांनी आपल्या ० ते ५ वर्षापर्यंतच्या बालकांना पोलिओ डोस पाजून घ्यावा,एकही बालक ना पोलिओ होऊ नये याकरिता आरोग्य यंत्रणा सक्षम असून पालकांनी आपल्या बालकांना पोलिओ लस घेऊन यंत्रणेस सहकार्य करावे असे आव्हान जिल्हा परिषद सदस्या यांनी केले.तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ.सुयोग कांबळे सर,यानी पोलीओ बद्दल उपस्थितांना मार्गदर्शन करुण आव्हान केले ते असे की पोलिओ मुक्त भारत आज अस्तित्वात असला,तरी भविष्यात देखील आपला देश पोलिओ मुक्तच रहावा यासाठी राज्यातील प्रत्येक ५ वर्षाखालील बालकाला पोलिओ डोस मिळणे गरजेचे असून एक जबाबदार नागरिक व सुजाण पालक या नात्याने प्रत्येकाने यासंबंधी जागरूकता बाळगून बालकांना पोलिओ डोस देणे गरजेचे आहे.
प्रामुख्याने उपस्थितीमध्ये सौ.काजल ताई चवळे(पंचायत समिती सदस्या)सौ.मंगलाताई ठवकर(सरपंच)पहेला,श्री.सुशिलजी बाडेबुचे(उपसरपंच)पहेला,चंद्रशेखर खराबे(पो.पा पहेला)श्री. घनश्यामजी खराबे (ग्रां.पं सदस्य पहेला) व सोबत सामाजिक कार्यकर्ते-अमोलभाऊ ठवकर,जितेंद्र बान्ते,अर्पित मेश्राम,व आरोग्य केंद्रातील बूथ सांभाळण्या करिता श्रीमती.ए.पि.मेश्राम(आरोग्य सेविका) व सौ.रीना ठवकर(अंगणवाडी सेविका) यानी महत्त्वाची भूमिका बजावली व आधी आरोग्य सेवा कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleअड्याळ येथील अशोक मोहरकर महाविद्यालयात संविधान जागृती कार्यक्रम
Next articleमाणसांच्या जगण्याची सुसंगत साहित्य मनाला भिडते : कवी चंद्रकांत पालवे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.