Home कोकण श्री पाणबुडी देवी कलामंच सह शाहिर दिपक भुवड तर्फे अनोखा शैक्षणिक उपक्रम…!...

श्री पाणबुडी देवी कलामंच सह शाहिर दिपक भुवड तर्फे अनोखा शैक्षणिक उपक्रम…! 🛑

293

राजेंद्र पाटील राऊत

🛑 श्री पाणबुडी देवी कलामंच सह शाहिर दिपक भुवड तर्फे अनोखा शैक्षणिक उपक्रम…! 🛑
✍️ चिपळूण 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

चिपळूण :-⭕चिपळूण तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा पोसरे नं.२ शाळेला दिली शैक्षणिक सप्रेम भेट.

चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोसरे नं.२ या शाळेचे माजी विद्यार्थी व पोसरे गावचे सुपूत्र असणारे शाहिर दिपक भुवड यांच्या संकल्पनेतून व श्री पाणबुडी देवी कलामंचाच्या विशेष सहकार्याने नुकताच या शाळेच्या गुणवत्ता विकासाला चालना मिळावी म्हणून शैक्षणिक उपक्रम हाती घेऊन कोव्हिड – १९ च्या पार्श्वभूमीवर देखील शाळेला भेट वस्तू म्हणून “कपाट” देत हा उपक्रम गुरुवार दि.०१ एप्रिल २०२१ रोजी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुप्रिया सावर्डेकर मॅडम,सह शिक्षिका वर्षा देसाई मॅडम,शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष अविनाश आदवडे,शालेय शिक्षक मंगेश पाडेकर सर, सदस्य – निलेश आंबेडे, श्रध्दा चांदीवडे, नंदा आदवडे,श्री पाणबुडी कलामंचाचे सदस्य शाहिर दिपक भुवड,तसेच सौ.चित्रा दिपक भुवड,पोसरे ग्रामस्थ मंडळ व विद्यार्थी पालक वर्ग यांच्या उपस्थितीत ही भेटवस्तू सुपूर्त करण्यात आली.मुंबई रंगभूमीवर अल्पवधीत कोकणातील नमन/जाखडी नृत्य/नाटक या लोककलेचं आयोजन करणारे,शिवाय विविध सामाजिक,शैक्षणिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणाऱ्या श्री संतोष घाणेकर यांचे श्री पाणबुडी देवी कलामंच व कोकण सुपूत्र शाहिर दिपक भुवड यांच्या प्रयत्नांतुन राबविण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे विविध स्तरातून अभिनंदनासह कौतुक होत आहे.⭕

Previous articleचिकूवाडी रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न 🛑
Next articleकोल्हापूरच्या नवलेखिकेचे ‘आठवणींच्या हिंदोळ्यावर’ पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.