• Home
  • कोल्हापूरच्या नवलेखिकेचे ‘आठवणींच्या हिंदोळ्यावर’ पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न 🛑

कोल्हापूरच्या नवलेखिकेचे ‘आठवणींच्या हिंदोळ्यावर’ पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न 🛑

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210406-WA0028.jpg

🛑 कोल्हापूरच्या नवलेखिकेचे ‘आठवणींच्या हिंदोळ्यावर’ पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न 🛑
✍️ कोल्हापूर 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

ता.आजरा:-⭕ आजरा तालूक्यातील नवलेखिका सौ.अश्विनी बजरंग व्हरकट यांचे ‘ आठवणींच्या हिंदोळ्यावर ‘ हे पुस्तक रविवारी गंगामाई वाचनालय आजरा येथे प्रकाशित झाले.

या पुस्तकातून गावाकडच्या व बालपनीच्या अल्लड आठवणी, शाळा कॉलेजच्या आठवणी … गौरी गणपती व हादग्याची गाणी याची मजा घेता येईल अशा या सुदंर पुस्तकाचे प्रकाशन रविवारी पार पडले.

लेखनाची आसलेली आवड एका पुस्तकातून वाचकापर्यत पोहचवण्यासाठी लेखणाचे गुरू माझे वडिल आहेत आणि त्याच्याच सहवासातून आज मी ईथपर्यत पोहचले.असे लेखिका सौ आश्विनी व्हरकट यानी आपल्या मनातील भावना या कार्यक्रमाद्वारे पोहचवल्या.पुस्तक प्रकाशनापर्यत सहकार्य करणाऱ्या प्रत्येकांचे आभार लेखिकाने मानले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी आजरा महाविद्यालयाचे प्राचार्य राजीव टोपले सर होते.

प्रा.सुभाष कोरे व जि.प.सदस्य जिवनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी विनय पब्लिकेशनचे प्रकाशक रविंद्र खैरे सर कोल्हापूर, कॉ. संपत दादा देसाई, आम्ही कोल्हापूरी फेसबुक समुहाचे अँडमिन अनिल धडाम, डॉ.सागर वांद्रे, संवेदना सचिव संतराम केसरकर , जयवंत चोरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पाडण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दयानंद भंडारी यांनी केले तर आभार अमृत सावंत यांनी मानले.

आपल्याला हे पुस्तक हवे असल्यास आपण 9689367713 या नंबवर संपर्क करून घेऊ शकता. ⭕

anews Banner

Leave A Comment