Home माझं गाव माझं गा-हाणं सुरगाणा तालुक्यात घरगुती गॅस टाकीचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळून...

सुरगाणा तालुक्यात घरगुती गॅस टाकीचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळून खाक.

94
0

राजेंद्र पाटील राऊत

सुरगाणा तालुक्यात घरगुती गॅस टाकीचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळून खाक. (युवा मराठा न्युज तालुका प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड )
सुरगाणा तालुक्यातील पळसन येथील दिनेश गुलाब देशमुख यांच्या घरगुती गॅस टाकीचा अचानक स्फोट होऊन लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले आहे. या आगीत घरात असलेलं वर्षभरासाठीच धान्य, कपडे, इतरांकडून गरज पूर्ण करण्यासाठी मागितलेली रक्कम,आजपर्यंतच्या शैक्षणिक प्रवासातील कागदपत्र, मौल्यवान वस्तू, जीवनाआवश्यक वस्तू सर्व जळून राख झाले. आग इतकी भयानक होती की काही मिनिटात होत्याच नव्हतं झालं. श्री दिनेश गुलाब देशमुख हे आपल्या पिढीजात घरामध्ये पत्नी, भाऊ व आई सोबत राहत होते, मागच्या वर्षी त्यांच्या वडिलांचं निधन झालं होत त्या दुःखातून कसबसं सावरून आपल्या संसाराचा गाडा रस्त्यावर आणण्याच्या प्रयत्नात असताना अचानक झालेल्या या दुःखद घटनेने पुरते होरपळून निघाले आहेत.
श्री दिनेश गुलाब गावित हे रोजनदारीने आश्रम शाळेत कामाला होते परंतु कोरोना सारख्या महामारीने शाळा पण बंद असल्यामुळे त्यांच्या हातची रोजीरोटी पण हिरावून गेली आहे. घरी शेती पण कोरडवाहू असल्यामुळे आर्थिक परिस्थिती ही एकदम हलाकीची.समाजकार्यत हिरीरीने भाग घेणारा हा माणूस आज त्याच सम्पूर्ण कुटुंब उघडयावर पडलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here