राजेंद्र पाटील राऊत
🛑 चिकूवाडी रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)
बोरीवली :-⭕ चिकूवाडी रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
उत्तर मुंबई चे खासदार श्री.गोपाळ शेट्टी यांनी जिल्ह्यात 500 रक्त पिशव्या संकलनाचा निर्धार आणि संकल्प केला असून त्यांनी हे काम फक्त राजकीय पक्षांनाच नाही तर सर्व सामाजिक संस्था यांनाही आवाहन केले आहे.
त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणुन बोरिवली स्थित चिकूवाडी रेसीडंट वेल्फेअर असोसिएशन संस्थेने त्वरित आज दिनांक 4.4.2021 रोजी संस्थेच्या प्रांगणात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.स्थानिक नागरिकांनी भरघोस पाठिंबा देत 110 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
रक्तदात्यांनी दाखविलेल्या विश्वासा बद्दल खासदार श्री. गोपाळ शेट्टी,आमदार श्री.सुनील राणे, जिल्हाध्यक्ष श्री.गणेश खणकर यांनी सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.
तसेच उत्कृष्ट आयोजनासाठी श्री.बापू गायकवाड, किरण मोटाणी आणि संयोजक महेश राऊत यांना सन्मानित करण्यात आले.⭕
