• Home
  • झेप प्रतिष्ठान तर्फे मुलुंड येथील डम्पिंग ग्राउंड कचरावेचक महिलांना सँनिटाय पँड चे वाटप करण्यात आले 🛑

झेप प्रतिष्ठान तर्फे मुलुंड येथील डम्पिंग ग्राउंड कचरावेचक महिलांना सँनिटाय पँड चे वाटप करण्यात आले 🛑

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210406-WA0022.jpg

🛑 झेप प्रतिष्ठान तर्फे मुलुंड येथील डम्पिंग ग्राउंड कचरावेचक महिलांना सँनिटाय पँड चे वाटप करण्यात आले 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

ठाणे:-⭕ठाणे मुलुंड शहरातील कचरा जिथे एकत्र केला जातो त्या कचऱ्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या या कचरावेचक महिलांना मासिक पाळी दरम्यान घेतल्या जाणाऱ्या आरोग्याच्या काळजीविषयक महत्त्वपूर्ण माहिती तसेच त्यांना वर्षभर पुरेल इतके sanitary pads आज झेप प्रतिष्ठान तर्फे वाटण्यात आले.आपल्या परिसराच्या स्वच्छतेची काळजी घेणाऱ्या या महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याची संधी झेप प्रतिष्ठानला मिळाली असे झेप प्रतिष्ठानचे विकास धनवडे यांनी सांगितले.

त्याच सोबत मासिक पाळी दरम्यान आरोग्याची काळजी कशी घ्यावी, sanitary pad ची विल्हेवाट कशी लावावी यावर ही मार्गदर्शन करण्यात आले.

पहिल्या टप्प्यात या महिलांना 3 महिने पुरेल इतके pad देण्यात आले.त्यानंतर पुन्हा त्यांच्या ओरोग्याची माहिती घेऊन त्यांना प्रत्येक 3 महिन्यांनी हे वाटप करण्यात येईल.कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता हा उपक्रम अत्यंत कमी वेळात आणि सोशल distance चे नियम पाळत करण्यात आला.

या उपक्रम करिता भोसले अजय महादेव आनंदी , Sandip Gole , Anil Autade , अतुल देखणे , Abhijit Kharade , Archana Phadtare – Shinde , सुशांत मणचेकर तसेच प्रिया कांबळे आणि वंदना गाडे मॅडम उपस्थित होत्या.

या उपक्रमासाठी मदत करणाऱ्या सर्व दानशूर व्यक्तींचे आभार झेप प्रतिष्ठानच्या प्रत्येक सदस्यांनी तसेच डम्पिंग ग्राउंड वरील महिलांनी मानले.⭕

anews Banner

Leave A Comment