Home नांदेड देगलूरमध्ये शिवराज्याभिषेक दिन उल्हासात साजरा

देगलूरमध्ये शिवराज्याभिषेक दिन उल्हासात साजरा

121
0

आशाताई बच्छाव

IMG-20230607-WA0049.jpg

देगलूरमध्ये शिवराज्याभिषेक दिन उल्हासात साजरा

देगलूर प्रतिनिधी, गजानन शिंदे,युवा मराठा न्यूज नेटवर्क

काल ०६ जुन ,२०२३ सकाळी आठ वाजता शिव स्मारक देगलुर येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक , आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा हर्षोल्हात साजरा करण्यात आला .डॉ. सुनील जाधव यांनी जिजाऊ वंदना गायन करून मानवंदना देण्यात आली . आमदार जितेश भाऊ अंतापुरकर , शिव स्मारक समिती अध्यक्ष अँड.अंकुश देसाई सह जनार्दन भाऊ बिरादार , अँड व्यंकटराव सुगावकर , अँड. रमेश जाधव , बालाजी थड्के , डॉ. सुनील जाधव , गजानन पाटील , शशांक पाटील , बालाजी पा. शहापूरकर , विठ्ठलराव भोसले , उमाकांत भुताळें, देविदास थड्के , शिवा डाकोरे , सदाशिव शिंदे आदी नी पुजन करून शिवरायांना मानवंदना दिली .
यावेळी माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार , पि. एस.आई. मोरे सर , प्रशांत पाटील भौकसखेडकर , गजानन पाटील नागराळकर ,जेजेराव पाटील शिंदे , नामदेव पा. थड्के , अँड. अंकुशराजे जाधव , ओंकार ऊल्लेवार , अरुणा ताई शिंदे (जाधव ) ,संजीवनी ताई सूर्यवंशी , देगावकर यादव , फुगारे सर आमदार कार्यालय , शिवाजी शिंदे सर आदी नी पुजन करून मानवंदना दिली.सुत्र संचालन डॉ. सुनील जाधव यांनी केले . या वेळी सर्व पक्ष , सामाजिक संघटना पदाधिकारी , सर्व समाजाचे शिव प्रेमी बंधु भगिनी , मराठा सेवा संघ , जिजाऊ व संभाजी ब्रिगेड सह तेहत्तीस कक्ष पदाधिकारी व मोठय़ा संख्येने शिव प्रेमी मावळे उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here