Home गडचिरोली डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी केलेले कार्य अतुलनीय–भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी केलेले कार्य अतुलनीय–भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे

27
0

आशाताई बच्छाव

IMG-20220623-WA0014.jpg

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी केलेले कार्य अतुलनीय–भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृती दिनानिमित्त व्याख्यान माला कार्यक्रम

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

वयाच्या २९ व्या वर्षी बंगालच्या विधिमंडळावर निवडून येणारे डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी हे वयाच्या अवघ्या ३३ वर्षी कलकत्ता विद्यापीठासारख्या नामांकित विद्यापीठाच्या कुलगुरू पदावर आरूढ झाले.एवढया लहान वयात कुलगुरू पद प्राप्त करन्याचा तेव्हा हा त्यांच्या विक्रमच होता.बंगाली भाषेला आणि अन्य भारतीय भाषांना शिक्षणक्रमात स्थान मिळवून देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेणारे शिक्षणतज्ञ म्हणून श्यामाप्रसादांची ख्याती होती.शिक्षणाच्या क्षेत्रात भारतीय विचार,अस्मितेचे जागरण यासाठी सार्वभौम आणि स्वतंत्र भारताच्या एकात्मतेसाठी प्राणार्पण करणारे थोर सेनानी जनसंघाचे संस्थापक डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे कार्य अतुलनीय असल्याचे प्रतिपादन जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांनी केले.

आज दि.२३ जून रोजी भारतीय जनता पार्टी गडचिरोलीच्या वतीने डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृती दिनानिमित्त इंदिरा गांधी चौकातील विश्राम गृह येथे व्याख्यान माला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. मुखर्जी यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकताना प्रमोदजी पिपरे बोलत होते.तसेच किसान आघाडी प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे यांनी सुध्दा डॉ. मुखर्जी यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या २३ जुन बलिदान दिनापासून ते ०६ जुलै जन्मदिवसापर्यंत या साप्ताह मध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या तालुक्यात,गावात तसेच वार्डात वृक्षारोपण, प्लॉस्टीक निर्मुलन, स्वच्छता अभियान व डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जीवणावर आधारित व्याख्यान तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे असे आवाहन प्रमोद पिपरे यांनी केले आहे.
यावेळी किसान आघाडी प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे,माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे,शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे,नप उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर,माजी जी.प.कृषी सभापती रमेशजी बारसागडे, महिला आघाडी शहर अध्यक्ष कविता उरकुडे, शहर महामंत्री विनोद देवोजवार, केशव निंबोड, युवा मोर्चा शहर अध्यक्ष सागर कुंभरे, शहर महामंत्री हर्षल गेडाम,निखिल चरडे, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, लता लाटकर,नीता उंदीरवाडे,रोशनी बानमारे,कोमल बारसागडे,पुनम हेमके,राजू शेरकी,नरेश हजारे,देवाजी लाटकर,विलास नैताम,श्याम वाढई,प्रशांत अमलपटलावार,प्रभाकर खोब्रागडे, ज्योती बागळे,रुपाली सातपुते, वंदना शिंपी,पंडित मेश्राम, रुपेश चौधरी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन सागर कुंभरे,प्रास्ताविक रमेशजी बारसागडे तर आभार मुक्तेश्वर काटवे यांनी मानले.

Previous articleपोलीस खबरी असल्याच्या सशंयावरुन नक्षल्यांनी केली हत्या।
Next articleडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ सलंग्नित कर्मयोगी बाबरावजी जोगदंड कृषी महाविद्यालय आमखेडा येथे योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here