Home नाशिक सर्वांनीच मराठी भाषेबद्दल अभिमान बाळगणे गरजेचे

सर्वांनीच मराठी भाषेबद्दल अभिमान बाळगणे गरजेचे

26
0

आशाताई बच्छाव

IMG_20240222_203035.jpg

सर्वांनीच मराठी भाषेबद्दल अभिमान बाळगणे गरजेचे

निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे

आजची तरुण पिढी ही या आधुनिक युगात भरकटत जात आहे. ही पिढी आपला अमूल्य वेळ भ्रमणध्वनी पाहण्यात गमावत आहे. हा अमूल्य वेळ त्यांनी वाचन करण्यात घालवला पाहीजे. यामुळे शब्दसाठा वृध्दींगत होण्यास मदत होईल. मराठी भाषेविषयी स्वाभिमान निर्माण होणार निश्चितच. मराठी भाषेविषयी अलोट प्रेम जागृती नक्कीच होणार आहे. अशी किमया फक्त या पृथ्वीवर मराठी भाषेत आहे. आपण सर्वांनीच मराठी भाषेबद्दल अभिमान बाळगणे गरजेचे आहे आवश्यक आहे. मराठी भाषेबद्दल आपण नेहमी आदर बाळगला पाहिजे. आणि तो प्रत्येक कृतीतून सर्वांचा दृष्टीस आणि निदर्शनास यायला हवा आहे. मला खरोखरच असे वाटते की परकीय भाषेचे आकर्षण आपण स्वतःपासून कमी करायला हवे.
ग्रामीण भागातील लोकांना जिल्हा परिषद शाळा न आवडता त्यांना इंग्लिश मिडीयमबद्दल जबरदस्त आकर्षण निर्माण झाले आहे. ते मराठी अस्मिता जपणुकीसाठी धोक्याचेचं म्हणावे लागेल. उलट आपण सर्व मराठी आहोत तर आपणच मुलांवर मराठीचा मान ठेवण्यासाठी त्याच्यावर मराठी भाषेबद्दल, जिल्हा परिषद शाळा यांच्याबद्दल सकारात्मकता दाखवायला पाहिजे. अशी जर आपण स्वतःपासून सुरुवात जर केली तर आकर्षणाच्या सिद्धांतानुसार मराठी भाषेचा आदर हा घरोघरी राखला जाणार आहे. यासाठी पालकांनीच मुलांच्या मनावर मराठी शाळेबद्दल आदर निर्माण होईल असे भाषिक स्ंप्रेशन देणे आवश्यक आहे. असे सकारात्मक वक्तव्य केले तर नक्कीच येणारी भावी पिढी ही मराठी भाषेची अस्मिता जपणारी, मराठीचा अभिमान बाळगणारा समाज झपाट्याने निर्माण होण्यास मदत होणार आहे.वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी घरात दर महिन्याला नवीन निदान दोन तरी नवी पुस्तके यायलाच हवी असा संकल्प प्रत्येक भारतीय नागरिकाने जर केला आणि तो मनःपूर्वक पाळला तर नक्कीच प्रत्येकाच्या मुखी मराठी भाषेची स्तुती निश्चित येणारच फक्त थोडा बदल करण्याची आवश्यकता आहे.

रामभाऊ आवारे
राज्य प्रसिध्दी प्रमुख युवा मराठा महासंघ

Previous articleमराठी साहित्याची आवड आपण मुलामध्ये निर्माण करायला हवी
Next articleशहरातील अर्धवट व अपूर्ण सिमेंट काँक्रीट रस्त्याची कामे तीन दिवसात सुरु करा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here