• Home
  • *गावठी दारू तयार करणाऱ्याची धरपकड ३४ लिटर दारू जप्त *

*गावठी दारू तयार करणाऱ्याची धरपकड ३४ लिटर दारू जप्त *

गावठी दारू तयार करणाऱ्याची धरपकड ३४ लिटर दारू जप्त *
पालघर , (वैभव पाटील  विभागीय संपादक )-बोईसर मधील धोडी पूजा येथील गावठी दारू करणाऱ्यावर उत्पादन शुल्क विभागाने धरपकड. बोईसर शहरातील धोडीपुजा गावात जास्त दरात विकली जाणारी 34 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली असून लवकरच या घोळात सामील झालेल्या दोषींची नावे देण्यात येणार असून, गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल, असे उत्पादन शुल्क विभाग निरिक्षक शैलेश शिंदे सांगितले आहे.
पालघर जिल्ह्यातील बोईसर शहरात असलेल्या धोडीपूजा गावात 30 जुलै रोजी उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक शैलेश शिंदे आणि त्यांच्या पथकाने अनेक वर्षांपासून धोडीपुजामध्ये अवैधरित्या विकल्या जाणाऱ्या दारूच्या अड्डयावर छापा मारून, तब्बल 34 लीटर गावठी दारू जप्त केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टाळेबंदीनंतर येथे विदेशी दारू आणि बिअर किंमतीच्या दुप्पट ते तिप्पट दराने विकली जात होती. ही बाब प्रशासनाच्या लक्षात प्रशासनाने याकडे बारकाईने लक्ष दिले. या प्रकरणी उत्पादन शुल्क विभाग निरीक्षक शैलेश शिंदे तपास करित आहेत.

anews Banner

Leave A Comment