• Home
  • समस्या तातडीने मार्गी लावाव्यात , इनाम. ची मागणी

समस्या तातडीने मार्गी लावाव्यात , इनाम. ची मागणी

 

कोल्हापूर : इचलकरंजी नगरी मधे गेल्या ४ ते ५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांचा वारंवार पाठपुरावा करूनही कारवाई होत नसल्याने गेल्या महिन्यात अन्नत्याग आंदोलन इचलकरंजी नागरिक मंचतर्फे करण्यात आले होते. प्रशासनाने समस्या निदर्शनास आणून दिल्यास कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार आज इचलकरंजी नागरीक मंचच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्ष अलका स्वामी यांची भेट घेऊन प्रलंबित समस्यांची मांडणी केली.
गावातील भटक्या कुत्र्यांचे व मोकाट जनावरांचे नियोजन,गावातील वाढते व फुटपाथवरील अतिक्रमण, वृक्षसंपदा जतन व तरु समिती कारभार चौकशी, शहरातील सार्वजनिक मुताऱ्याची दुरवस्था व नवीन मुताऱ्या बसविणे,जीपीएस मोजणीबाबत तातडीने निर्णय घेऊन पालिकेचे उत्पन्न वाढवणे,शासन परिपत्रकानुसार माहिती अधिकार लोगो प्रसिद्धी करणे तसेच माहिती अधिकार दिन साजरा करणे,सार्वजनिक अभिलेख नागरिकांना पाहणीसाठी खुले करणे,स्मशानभुमी पार्किंग समस्या,बेकायदेशीर वृक्षतोड बाबत तातडीने गुन्हे दाखल करणे,हायकोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन करून बसवलेले निकृष्ट स्पीडब्रेकरचा खर्च वसूल करणे,१०७ कोटीच्या कामकाजातील तक्रारींवर कारवाई करणे,कूपनलिका पाणी नियोजण,रेन वॉटर हार्वेस्टिंग टायमर बसवणे,नळांना चाव्या बसवणे,फिल्टर हाऊस येथील वॉश आऊटचे वाया जाणारे पाणी नियोजन करणे,शहर वाहतूक समस्येवर गांभीर्याने लक्ष देणे,अनधिकृत फळ मार्केट हलविणे अशा समस्या मांडल्या.
वरील समस्यांबाबत वारंवार निवेदने देऊनही पालिका प्रशासनाकडून होत असलेल्या विलंबाबत कार्यकर्त्यानी नाराजी व्यक्त केली.चर्चेत पाणीपुरवठा सभापती विठ्ठल चोपडे सहभागी झाले होते पाणीपुरवठयाच्या प्रश्नावर टायमर बसवण्याचे काम पूर्ण झाले असून पाण्याच्या टाक्याबाबत वाहतूक बघून निर्णय घेतला जाईल तसेच रेनवॉटर हार्वेस्टिंगचे अंदाजपत्रक तयार असून निधी नसल्याने काम रखडल्याचे सांगितले.तसेच वॉश आऊटच्या पाण्याच्या टाकीचे काम पूर्णत्वास आले असून पंप बसवून लगेच टाकीचे उदघाटन करणार असल्याचे सांगितले.इतर समस्यांबाबाबत मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून तातडीने होणारी कामे लगेच करण्यात येतील तसेच इतर कामाबाबत कळवण्याबाबत आश्वासन दिले.
यावेळी इचलकरंजी नागरिक मंचचे संजय डाके,शितल मगदूम,आप्पासाहेब पाटील,धैर्यशील कदम,सचिन बाबर,हरीश देवाडीगा, नागेश सुर्यवंशी,जावेद मुल्ला,महेंद्र जाधव,किरण माळी,दिनेश सोनटक्के,राजु कोंनूर,उमेश पाटील,रावसाहेब चौगुले,दिपक जाधव, अमित बियाणी,दिपक लाटणे,अमोल ढवळे, दीपक पंडित, सागर बाणदार,अमित सारडा,पंडित ढवळे,राजेश बांगड,गिरीश रेवणकर, रविंद भंडारी,अभिजित पटवा उपस्थित होते.

(कोल्हापूर )
युवा मराठा न्यूज नेटवर्क.

anews Banner

Leave A Comment