Home गडचिरोली भाजपचे सरकार आदिवासी विरोधी विकासाच्या नावाखाली साधनसंपत्तीची लुट करण्याचे धोरण : शेकाप...

भाजपचे सरकार आदिवासी विरोधी विकासाच्या नावाखाली साधनसंपत्तीची लुट करण्याचे धोरण : शेकाप नेते भाई रामदास जराते यांची टिका

19
0

आशाताई बच्छाव

IMG_20240121_080720.jpg

 

भाजपचे सरकार आदिवासी विरोधी

विकासाच्या नावाखाली साधनसंपत्तीची लुट करण्याचे धोरण : शेकाप नेते भाई रामदास जराते यांची टिका

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ): –भारतीय जनता पक्षाचा धार्मिक आणि जातीयवादी अजेंडा आदिवासींच्या उरावर बसला असून भांडवलदारांना हाताशी धरुन गडचिरोली जिल्ह्यातील नैसर्गिक संपत्तीची लूट केली जात आहे. ब्राह्मणी देवधर्म थोपवून मुळनिवासी संस्कृती संपविण्याचे काम केले जात असून विकासाच्या नावाखाली खाणी खोदून आदिवासी समाजाचे अस्तित्व संपविण्याचे काम करणाऱ्यांपासून सावध राहावे असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी केले.

जय पेरसापेन आदिवासी क्रीडा मंडळाच्या वतीने तालुक्यातील जमगाव येथे आयोजित भव्य कबड्डी व व्हालिबाॅल स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. भाई रामदास जराते पुढे म्हणाले की, काही लोक विकास आणि फुकटचे आमिष दाखवून लोकांना खुष करण्याचा आणि भक्ती पेक्षा राममंदिराचा इव्हेंट करुन मुर्ख बनविण्याचे प्रयत्न करीत आहेत. मात्र आदिवासींच्या प्रथा, परंपरा या वेगळ्या असून अशा प्रकाराला बळी पडून आपली संस्कृती नष्ट करु नये. तसेच खेळासाठी एकत्र आलेल्या तरुणांनी आपली साधनसंपत्ती वाचवण्यासाठी सरकार विरोधात संघर्ष करण्याची गरज असल्याचेही प्रतिपादन भाई रामदास जराते यांनी केले.

कबड्डी व व्हालिबाॅल स्पर्धेच्या उद्घाटनला उद्घाटक म्हणून आमदार डॉ देवराव होळी तर प्रमुख अतिथी म्हणून बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाचे जिल्हा प्रभारी राज बन्सोड, पुरुषोत्तम रामटेके, प्रतिक डांगे, भाजपचे तालुकाध्यक्ष हेमंत बोरकुटे, आदिवासी विकास युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष विनोद मडावी, जमगावचे सरपंच देविदास मडावी, ग्रामपंचायत सदस्य मारोती हिचामी, बाबुराव नरोटे, नागसू कुमरे, खुशाल गावडे, महेश कुमरे,भाऊजी गावडे, वासुदेव गावडे,तुंगा किरंगे, तसेच जय पेरसापेन युवा मंडळाचे कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी आमदार डॉ. देवराव होळी, राज बन्सोड यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक आणि ७० पेक्षा अधिक संख्येने खेळाडू संघ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleगेवराईत मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत; ५० जेसीबीच्या माध्यमातून त्यांच्यावर पुष्पवृष्टी
Next articleलोकशाही टिकविण्यासाठी समाज घटकांनी जागरूक झाले पाहीजे- डॉ सर्जेराव शिंदे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here