Home बीड गेवराईत मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत; ५० जेसीबीच्या माध्यमातून त्यांच्यावर पुष्पवृष्टी

गेवराईत मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत; ५० जेसीबीच्या माध्यमातून त्यांच्यावर पुष्पवृष्टी

116

आशाताई बच्छाव

IMG_20240121_080326.jpg

गेवराईत मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत; ५० जेसीबीच्या माध्यमातून त्यांच्यावर पुष्पवृष्टी

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा

बीड/गेवराई दि:२०  मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे जात असताना गेवराई त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.यावेळी ५० जेसीबीच्या माध्यमातून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.त्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी कमानी उभारण्यात आल्या होत्या यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते.मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईकडे दिनांक २० जानेवारीला रोजी सराटी आंतरवाली इथुन मुंबईकडे जात असताना त्यांचे गेवराई तालुक्यात सायंकाळी पाच वाजता आगमन झाले.त्यांच्या स्वागतासाठी सकाळपासूनच बच्चे कंपनी पासून वृद्धा पर्यंत मराठा समन्वयक रस्त्याच्या दुतर्फाला उभे होते.ठिकठिकाणी कमानी उभारण्यात आल्या होत्या… तसेच मराठा बांधवांसाठी पाण्याची सोय देखील करण्यात आली होती.गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्यांच्या आगमन झाले यावेळी ५० जेसीबीच्या माध्यमातून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. महाराजाची आरती झाली व त्यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी शेकडो तोफांची सलामी देखील मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आली
.मराठा लाख मराठा या घोषणेने शहर दणाणून गेले होते.तसेच मराठा बांधवांसाठी कोळगाव या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून परिसरातील आसपासच्या ५० गावांनी भाजी भाकरी पिठलं अशा जेवणाची २० ठिकाणी सोय केली.तसेच ठिकठिकाणी पाण्याची देखील सोय करण्यात आले होती तर गेवराई शहरांमध्ये मराठा बांधवाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते तर असंख्य गाड्यांचा ताफा त्यांच्याबरोबर होता. मराठा बांधवांनी खाण्यापण्याची सोय स्वतःच्या गाडीमध्ये सर्व साहित्य घेऊन मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईकडे कुच करत होते. तर एक मराठा लाख मराठा घोषणेने गेवराई शहर दणाणून गेले होते.भगव्या झेंड्याने शहरात भगवे वादळ निर्माण झाले.

जय जिजाऊ जय शिवराय च्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला

मनोज जरांगे पाटील आज मुंबईकडे रवाना झाले असून लाखोच्या संख्येने मराठा आज एकवटलेला दिसला ऊन वारा ची तमा न बाळगता जरांगे पाटील आपल्या गावात येणार यासाठी स्वागत उत्सुक होते जरांगे पाटील यांच्या आगमनाने नवं चैतन्य संचारले होते ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार लाखो लोक होते.

Previous articleजिल्हाधिकारी कार्यालयाची इमारतही आता नवीन होणार!
Next articleभाजपचे सरकार आदिवासी विरोधी विकासाच्या नावाखाली साधनसंपत्तीची लुट करण्याचे धोरण : शेकाप नेते भाई रामदास जराते यांची टिका
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.