Home नांदेड लोकशाही टिकविण्यासाठी समाज घटकांनी जागरूक झाले पाहीजे- डॉ सर्जेराव शिंदे

लोकशाही टिकविण्यासाठी समाज घटकांनी जागरूक झाले पाहीजे- डॉ सर्जेराव शिंदे

21
0

आशाताई बच्छाव

IMG_20240121_081120.jpg

लोकशाही टिकविण्यासाठी समाज घटकांनी जागरूक झाले पाहीजे- डॉ सर्जेराव शिंदे

देगलूर तालुका प्रतिनिधी, (गजानन शिंदे)

देगलूर :-
लोकशाही ही शासन व्यवस्था मजबूत व भक्कम करण्यात राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयाचे महत्वपूर्ण योगदान आहे. विषयाचे अस्तित्व टीकविन्यासाठी विषयाची उपयुक्तता वाढविने आवश्यक आहे लोकशाही मूल्य रूजविन्यासाठी सर्व घटकानी जागरुक झाले पाहिजे. असे प्रतिपादन स्वा रा ती म विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ सर्जराव शिंदे यानी केले
ते येथील अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग ,स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ,नांदेड आणि महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोक प्रशासन परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ४०व्या राष्ट्रीय अधिवेशन समारोप कार्यक्रमात मार्गदर्शन करीत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ मोहन ख़ताळ होते तर व्यासपीठावर लोकप्रशासन अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम आय शेख़ असे म्हनाले की, भयमूक्त लोकशाही निर्माण करन्यात राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयाच्या प्राध्यापकांची भूमिका महत्वपूर्ण आहे असे प्रतिपादन केले. महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेचे अध्यक्ष डॉ. संजय वाघ व सचिव डॉ. संभाजी पाटील, संमेलनाध्यक्ष आदर्शमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विलास आघाव , अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी मंडळ सदस्य जनार्दन चिद्रावार , रवींद्र अप्पा द्याडे , चंद्रकांत नारलावार, विचारमंथन संशोधन पत्रिकेचे संपादक डॉ प्रमोद पवार, डॉ. मनोहर पाटील, डॉ. पी.डी.देवरे यांची विशेष उपस्थिती होती .
प्रारंभी प्राचार्य डॉ. मोहन खताळ यांनी अधिवेशनातील उपस्थिती व झालेले विचारमंथन अभ्यासपूर्ण व विषयाच्या विकाससात ऊपयुकि्त आहे असे अध्यक्षीय समारोपात मत व्यक्त केले. आमच्या महाविद्यालयात या दोन दिवसीय अधिवेशनात सहभागी झालेल्या प्राध्यापक व पीएच. डी. संशोधक विद्यार्थ्याला निश्चित उपयोग होईल असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. माधव चोले तर आभार डॉ. रत्नाकर लक्षटे यांनी मानले या अधिवेशनात एकून २०५ प्राध्यापक व संशोधक आपले शोधनिबंध सादर केले. महाराष्ट्र व देशभरातील राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयाच्या प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांनी या अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ऊपप्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार, उपप्राचार्य प्रा. ऊतमकुमार कांबळे , पर्यवेक्षक प्रा. संग्राम पाटील , कार्यालय अधीक्षक गोविंद जोशी यांच्यासह प्राध्यापक, पीएच.डी.संशोधक , कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here