Home कोल्हापूर विवाहितेची मोबाईलवर लाईव्ह विडीओ करून आत्महत्या

विवाहितेची मोबाईलवर लाईव्ह विडीओ करून आत्महत्या

114
0

राजेंद्र पाटील राऊत

विवाहितेची मोबाईलवर लाईव्ह विडीओ करून आत्महत्या

कोल्हापूर : मोबाईलवर लाईव्ह व्हिडीओ करत विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आर. के. नगर मधील हरी पार्क, पोस्टल कॉलनीत बुधवारी मध्यरात्री घडली. धनश्री जाधव (२५, सध्या रा. आर. के. नगर, कोल्हापूर. मूळ गाव एरंडोळ, ता. आजरा) असे मृत महिलेचे नाव आहे. उदय पालकर या घरमालकांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
धनश्री जाधव यांचा विवाह झाला होता. त्यांना एक मुलगाही आहे. तो आई-वडिलांकडे असतो. त्या पतीपासून विभक्त राहत होत्या. पुण्यात दोन वर्षे खासगी नोकरी करून त्या गेली वर्षभर कोल्हापुरात आर. के. नगरातील पालकर यांच्या घरी भाडेकरू म्हणून राहत होत्या.
एका बँकेच्या क्रेडिट कार्ड मार्केटिंगचे काम त्या करत होत्या. त्यांची कोल्हापुरात एकासोबत मैत्री जमली होती. बुधवारी रात्री त्यांनी मित्राशी संवाद साधला. त्यानंतर विवाहितेने गळफास लावून आत्महत्या करत असल्याचे मोबाईलवरून व्हिडिओ मित्राला पाठविला. त्यावेळी मित्राने धनश्री जाधव राहत असलेले घर गाठले. मित्राने घरमालक पालकर यांना परिस्थिती सांगितली. त्यांनी दार ठोठावून धनश्रीला दार उघडण्याबाबत विनंती केली, पण प्रतिसाद न आल्याने त्यांनी खिडकीतून पाहिले असता त्यांनी छताच्या पंख्याला वायरीने गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले.
खोलीमध्ये मिळालेल्या सुसाईड नोटवर आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये, असा मजकूर आहे. त्यामुळे त्यांनी नैराश्येतून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. आत्महत्या करत असल्याचा मोबाईलवरील व्हिडिओ विवाहितेने तिच्या मित्राला पाठविला होता. तो व्हिडीओ करवीर पोलिसांनी जप्त केला.
युवा मराठा न्यूज नेटवर्क .

Previous articleसमस्या तातडीने मार्गी लावाव्यात , इनाम. ची मागणी
Next articleस्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या महिलांसाठी विनामुल्य अभ्यासिका सुरु
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here