• Home
  • 🛑 बाप्पा पावला…! चाकरमान्यांसाठी : रत्नागिरीत येणाऱ्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय…! 🛑

🛑 बाप्पा पावला…! चाकरमान्यांसाठी : रत्नागिरीत येणाऱ्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय…! 🛑

🛑 बाप्पा पावला…! चाकरमान्यांसाठी : रत्नागिरीत येणाऱ्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय…! 🛑
✍️रत्नागिरी 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

रत्नागिरी :⭕ महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. राज्यभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. या परिस्थितीत चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी गावाकडे जाण्याचे वेध लागले आहे. कोरोना परिस्थितीमुळे गावाकडे येण्यास मनाई केली आहे.

पण, आता रत्नागिरीत येणाऱ्या चाकरमान्यांना विना पास परवानगी देण्यात आली आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना अटी शर्थी घालून देण्यात आल्या आहे. बाहेरच्या जिल्ह्यातून कोकणात येणाऱ्याना चौदा दिवसांचा क्वारंटाइन पाळावाच लागेल, अशी सूचना देण्यात आली आहे.

पण, आता रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करण्यास सर्व अटी शिथिल करण्यात आल्या आहे.

ज्या चाकरमान्यांकडे पास नाही, अशा चाकरमान्यांना जिल्ह्यात प्रवेश करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

कशेडी घाटात कडक निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. जिल्हा बंदीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय घेतला आहे.

याआधी विनापरवानगी घेऊन जिल्ह्यात येण्यास बंदी होती. पण, आता हा निर्णय रद्द करण्यात आला आहे.

जिल्ह्याच्या सीमेवरील कशेडी घाटात वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागत होत्या. त्यात होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने निर्णय घेतला आहे. लाखो चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणच्या वाटेवर आहे. त्यामुळे रत्नागिरीमध्ये येणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे….⭕

anews Banner

Leave A Comment