• Home
  • *नागरिकांना आता तलाठी कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही,सात बारा पाठोपाठ आता आठ-अचा उताराही ऑनलाइन*

*नागरिकांना आता तलाठी कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही,सात बारा पाठोपाठ आता आठ-अचा उताराही ऑनलाइन*

नागरिकांना आता तलाठी कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही,सात बारा पाठोपाठ आता आठ-अचा उताराही ऑनलाइन

विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

डिजिटल सातबारा पाठोपाठ आता जमिनीचा खाते उतारा म्हणजेच गाक नमुना 8-अ चा उताराही ऑनलाइन मिळणार आहे. या ‘डिजिटल 8 अ’सुविधेचा ऑनलाईन शुभारंभ महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते आज करण्यात आला.

नागरिकांना तलाठी कार्यालयात चकरा माराव्या लागू नयेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला. ‘ई फेरफार कार्यक्रमांतर्गत डिजिटल स्काक्षरीत आठ अ खाते उतारा उपलब्ध होणार आहे. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी, पीक कर्ज किंका जमीन खरेदी-किक्रीसाठी सातबारा सोबत खाते उतारा देखील आवश्यकत असतो. त्यामुळे महसूल विभागाने खाते उतारा देखील तलाठय़ांच्या डिजिटल सहीने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.

साडेसतरा लाखांहून अधिक लोकांनी घेतला डिजिटल सात बारा

आजपर्यंत साडेसतरा लाखांहून अधिक लोकांनी ‘डिजिटल 7/12‘ घेतला आह़े त्याचप्रमाणे आता ‘डिजिटल 8 अ’लासुद्धा असाच प्रतिसाद मिळेल अशी मला आशा आहे. महसूल प्रशासन लोकाभिमुख व गतिमान करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र प्रयत्न करूया असे आकाहन थोरात यांनी यावेळी केले.

anews Banner

Leave A Comment