Home सामाजिक मराठी साहित्याची आवड आपण मुलामध्ये निर्माण करायला हवी

मराठी साहित्याची आवड आपण मुलामध्ये निर्माण करायला हवी

33
0

आशाताई बच्छाव

IMG_20240222_202620.jpg

मराठी साहित्याची आवड आपण मुलामध्ये निर्माण करायला हवी

अनेक पवित्र तीर्थ क्षेत्र आपल्या महाराष्ट्रात आहेत. अनेक धार्मिक ग्रंथ रामायण, महाभारत, गीता, कुराण, बायबल असे एक नाही तर अनेक धार्मिक ग्रंथ महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला मिळाले आहे. हे खरंच खूप वंदनीय आहे. संस्कृतमधील वाचन सरावामुळे आपले उच्चार खूप सुस्पष्ट होतात. असा सर्वांगीण विकास करणारे अमर साहित्य आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकास लाभले आहे. ते खरंच आपले नशीब म्हणावं लागेल. प्रत्येक नागरिकाने या धर्मग्रंथात असणारी शिकवण आचरणात आणून त्याचे संस्कार मुलांवर करण्याचे कर्तव्य बजावणे खूप खूप आवश्यक आहे. असा रीतीने आपण मराठीबद्दल प्रेम, आवड निर्माण करू शकतो.
मराठी साहित्य खूप विस्तीर्ण आहे. त्या साहित्याची आवड आपण मुलामध्ये निर्माण करायला हवी, त्यामुळे सतत वाचनास प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. सर्व भावी पिढीची पाऊले आपण मोबाईल दुकानाकडे न वळवता ती ग्रंथालयाला वळली पाहिजे. अशी प्रतिभा, प्रतिबिंब मुलांच्या मनावर बिंबवले पाहिजे, मराठी संस्कृतीचा जबरदस्त ठसा त्यांच्या मनावर बालपणीच रुजला गेला पाहिजे. असे ठसे उमटले की खूप मराठीप्रेमी आपणास निश्चितच पाहायला मिळणार आहेत.
आपले भविष्य आपल्याच हातात असते या उक्तीनुसार आपला महाराष्ट्र आपल्याला मराठीकडे वळवायचा की इंग्लिशकडे हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. मराठीकडे जर पाऊले वळली तर नक्कीच सर्व जन सुसंस्कृत आणि संस्कारी निर्माण होतील, यासाठीच आपण प्रत्येकाने थोडसे जागरूक असणे गरजेचे आहे. गड किल्ल्यांच्या सतत सहली काढून त्यांना सतत त्याची इतिहासातील माहिती जाणीवपूर्वक सांगितली पाहिजे. अश्यामुळे मुलांना इतिहास कसा होता याची परिपूर्ण माहिती मिळेल. आणि ती चिरकाल स्मरणात राहील.

सौ उमा (जयश्री) चव्हाण
आदर्श शिक्षिका – छत्रपती शिवाजी माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय वनसगाव

Previous articleभेंडा मुळा कारखान्याबाबत साखर आयुक्तांना निवेदन
Next articleसर्वांनीच मराठी भाषेबद्दल अभिमान बाळगणे गरजेचे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here