Home नांदेड कदम अकॅडमी च्या लोहकरे राहुलने गणित विषयात मिळवले 100 पैकी 100 गुण.

कदम अकॅडमी च्या लोहकरे राहुलने गणित विषयात मिळवले 100 पैकी 100 गुण.

95

आशाताई बच्छाव

IMG-20220623-WA0026.jpg

कदम अकॅडमी च्या लोहकरे राहुलने गणित विषयात मिळवले 100 पैकी 100 गुण.

नायगाव तालुका प्रतिनिधी निळकंठ मोरे पाटील (युवा मराठा न्युज)

नायगाव शहरात सध्या शिक्षणाचे जाळे मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नायगाव शहरातील कदम अकॅडमीत गणिताचे धडे घेनाऱ्या राहुल लोहकरे या विद्यार्थ्याने नुकत्याच झालेल्या इयत्ता 12 च्या परीक्षेत गणित विषयात 100 पैकी 100 गुण घेऊन नायगावच्या शैक्षणिक क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे त्याबद्दल त्याचा कदम अकॅडमी चे संचालक श्रीकांत कदम यांच्यावतीने सत्कार करण्यात आला आहे.

नायगाव शहरात अनेक शैक्षणिक संस्था व क्लासेस यांचे जाळे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यातून गुणवत्तेची स्पर्धा मोठी झाली आहे. अनेक नवोदित कलासेस जोमाने विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करीत आहेत. त्यात काही क्लासेस संचालकांनी आपली गुणवत्ता राखून इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षेच्या निकालातून दाखवून दिले आहे. गणिता सारख्या कठीण विषयात 100 पैकी 100 गुण मिळवण्याची किमया कदम अकॅडमी च्या राहुल लोहकरे याने करून दाखवल्याने शहरात कदम अकॅडमीचे संचालक श्रीकांत कदम यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

कदम अकॅडमी च्या लोहकरे राहुलने गणित विषयात मिळवले 100 पैकी 100 गुण.कदम अकॅडमी चे संचालक श्रीकांत कदम यांच्यावतीने सत्कार करण्यात आला आहे.

Previous articleराजकीय गदारोळातही ठाकरे सरकारचे मोठे निर्णय, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..!
Next articleकृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थांचा पळसगाव येथे ग्राम सर्वेक्षण उपक्रम.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.