Home माझं गाव माझं गा-हाणं जनरेटरच्या धुरात कोडुंन चार जण बेशुद्ध बोईसरमध्ये बेकायदेशीर पणे सुरू होते एल्युर...

जनरेटरच्या धुरात कोडुंन चार जण बेशुद्ध बोईसरमध्ये बेकायदेशीर पणे सुरू होते एल्युर सलून. शेजारच्या दुकानदाराच्या सतर्कतेने दुर्घटना टळली.

190
0

राजेंद्र पाटील राऊत

जनरेटरच्या धुरात कोडुंन चार जण बेशुद्ध बोईसरमध्ये बेकायदेशीर पणे सुरू होते एल्युर सलून.

शेजारच्या दुकानदाराच्या सतर्कतेने दुर्घटना टळली.

(वैभव पाटील विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)
बोइसर- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून जारी करण्यात आलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करून बोईसर शहरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या अल्युर स्पा अँड सलून मध्ये शुक्रवारी (ता.28) दुपारी एक वाजताच्या सुमारास जनरेटरच्या धुरात कोंडुन चार जण बेशुद्ध पडल्याची घटना समोर आली आहे. त्यांना तातडीने बोईसर मधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.त्यामुळे बेकायदेशीरपणे व्यवसाय सुरू ठेवणाऱ्यांवर कारवाईची मागणी पुढे येत आहे.

राज्यात कोरोना विषाणू बाधित रूग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ झाल्याने ब्रेक द चेन अंतर्गत एप्रिल महिन्यापासून राज्यभरात निर्बंध लागू करण्यात आले होते.यात हॉटेल,स्पा आणि सलून व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले होते.परंतु निर्बंध झुगारून बेकायदेशीर सलून सुरू ठेवण्याचे प्रकार वाढत आहेत.शुक्रवारी दुपारी बोईसर शहरातील अल्युर स्पा चे शटर बंद करून आत मध्ये गिऱ्हाईक बसवून बेकायदेशीरपणे व्यवसाय सुरू होता.दरम्यान वीज पुरवठा खंडित झाल्याने स्पा मध्ये जनरेटर सुरू करण्यात आले होते. सर्व दारे खिडक्या बंद असल्याने जनरेटर मधून निघणाऱ्या धुरात कोंडून स्पा मधील मालक धनश्री संखे(वय.35)यांच्यासह युसुफ शेख (वय.25)योगिता वेलणकर(वय.23) प्रभा (वय.38) बेशुद्ध पडल्या होत्या.शेजारच्या दुकानदाराला संशय आल्याने त्याने शटर उघडून पहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. तात्काळ रुग्णवाहिका पाचारण करून चौघांना उपचारासाठी बोईसर मधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारानंतर चौघांची प्रकृती स्थिर आहे.

याप्रकरणी बोईसर पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली असून चौकशीनंतर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Previous articleकल्लहिप्परगे येथे रानगव्याचा धुमाकूळ /रान गव्याला पकडण्यासाठी वनविभाग व पोलीस यंत्रणा सज्ज. 
Next articleलिंगायत महासंघाच्या कोल्हापुर जिल्हासंघटकपदी चंद्रकांत पाटील यांची निवड.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here