Home पश्चिम महाराष्ट्र कल्लहिप्परगे येथे रानगव्याचा धुमाकूळ /रान गव्याला पकडण्यासाठी वनविभाग व पोलीस यंत्रणा सज्ज. 

कल्लहिप्परगे येथे रानगव्याचा धुमाकूळ /रान गव्याला पकडण्यासाठी वनविभाग व पोलीस यंत्रणा सज्ज. 

119
0

राजेंद्र पाटील राऊत

कल्लहिप्परगे येथे रानगव्याचा धुमाकूळ /रान गव्याला पकडण्यासाठी वनविभाग व पोलीस यंत्रणा सज्ज.
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप

अक्कलकोट तालुक्यातील कल्लहिप्परगे येथे आज अचानक रानगव्याचे आगमन झाल्याने परिसरात एकच धुमाकूळ माजला गेला.तेव्हा शिवसनेचे तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी संबंधित वनविभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाला माहिती दिली .तेव्हा त्वरित वनविभाग व पोलीस प्रशासन दखल घेत संपूर्ण परिसर सील केला.संबंधित यंत्रणा कल्लहिप्परगे गावात पोहचताच रानगव्याचा धुमाकुळ सुरु झाला. गव्याला पकडण्यासाठी गावकरी, वनविभाग व पोलीस प्रशासन शर्तीचे प्रयत्न करताना दिसून येत होते.तेव्हा या परिसरात एकच गोंधळ सुरु झाला. परिसरात भितीचे वातावरण निर्माण होऊन नागरिक गावाकडे पळ काढताना दिसून येत होते.तेव्हा संबंधित वन विभाग व पोलीस परिसरातील गावांना अलर्ट करताना दिसून येत होते.परिसरात ऊसाची शेती असल्याने ऊसात गवा आश्रय घेतल्याचे सांगण्यात आले.सायंकाळी उशीरापर्यंत गव्याला पकडण्यासाठी वन विभाग व पोलीस प्रशासनाचा शर्तीचे प्रयत्न सुरु होते.
वनविभाग टीम मध्ये कुताटे,विभुते आदी सहकारी उपस्थित होते. तसेच दक्षिण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली मल्लिनाथ कलशेट्टी,संजय पांढरे,भाऊ सरवदे,लक्ष्मण कांबळे गोलू बिराजदार, पोलीस पाटील संतोष गुजा व शिवसेनेचे तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी गावपातळीवरील शिवसेना कार्यकर्त्यांना मदतीला घेऊन वनविभाग व पोलीस प्रशासनाला मदत करत होते.या मध्ये अनिल गुजा,भिमाशंकर भैरुणगी,माळप्पा पुजारी,अमोगी शिंगे,विद्याधर शिंगे,पंडित मोरे,यल्लप्पा मोरे,सिध्दु कोटी,लक्ष्मण हडपद,राकेश मणुरे,सुरेश आलुरे,श्रीपती मोरे,नितीन मोरे,शिवराय मोरे,रघु मोरे,संजय सुतार,शांतु पट्टणशेट्टी,मुनाफ चिरके व गावातील बहुसंख्य तरुण वर्ग आदी उपस्थित होते.

Previous articleपुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर”                   
Next articleजनरेटरच्या धुरात कोडुंन चार जण बेशुद्ध बोईसरमध्ये बेकायदेशीर पणे सुरू होते एल्युर सलून. शेजारच्या दुकानदाराच्या सतर्कतेने दुर्घटना टळली.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here