Home नाशिक मुळाणे ग्रामस्थातर्फ पोलिस उपनिरीक्षक प्रसाद रौंदळचा नागरी सत्कार

मुळाणे ग्रामस्थातर्फ पोलिस उपनिरीक्षक प्रसाद रौंदळचा नागरी सत्कार

153

आशाताई बच्छाव

IMG-20220628-WA0062.jpg

मुळाणे ग्रामस्थातर्फ पोलिस उपनिरीक्षक प्रसाद रौंदळचा नागरी सत्कार
पिंगळवाडे,, बागलाण तालुक्यातील मुळाणे येथील नवनिर्वाचित पोलीस उपनिरीक्षक प्रसाद दिलीप रौंदळ यांचा नागरी सत्कार ग्रामस्थांतर्फे येथील हनुमान मंदिरासमोर आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे नेते रामचंद्र बापू पाटील होते
कार्यक्रमाच्या प्रारंभी येथील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना प्रसाद रौंदळ यांनी हार अर्पण करून कार्यक्रमास प्रारंभ केला यावेळी संपूर्ण गाव एकजुटीने उपस्थित होते. माझा सत्कार जन्मभूमीत झाल्याचा मला अभिमान असून या सत्काराने मी पूर्णपणे भारावून गेलो आणि मुळाने गावाचे ऋण निश्चितपणे पुर्ण करेल असे उद्गार नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक प्रसाद रौंदळ यांनी यावेळी सांगितले शेतकरी संघटनेचे नेते रामचंद्र बापू पाटील म्हणाले की मुळाणे गाव एक कष्टाळू गाव असून शैक्षणिक दृष्ट्या पुढे जात असून प्रसादने गावाचे नाव उज्ज्वल केले ही गावातच्या दुष्टिने अभिमानाची बाब आहे येथील तरुणांनी यांचा बोध घ्यावा या कार्यक्रमाला माजी सरपंच जिभाऊ पाटील संदीप ह्याळिज ग्रामपंचायत सदस्य काकाजी रौंदळ कारभारी रौंदळ सामाजिक कार्यकर्ते पंकज रौंदळ नामदेव पवार किरण पाटील कैलास पाटील किशोर पाटील योगेश पाटील विलास ह्याळीज सुधाकर निकम रमेश ह्याळीज, विठ्ठल ह्याळीज,शरद रौंदळ बारकू रौंदळ कारभारी रौंदळ कमोद ह्याळीज, पोपट ह्याळीज,पंडीत रौंदळ,बारकु रौंदळ बाळू रौंदळ, किशोर रौंदळ वसंत रौंदळ,नथू रौंदळ, कारभारी अहिरे,यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
आजोबांचा शब्द आठवणीत ठरला
पोलीस उपनिरीक्षक प्रसाद रौंदळ यांचे आजोबा दिवंगत लक्ष्मण फकिरा पाटील यांनी प्रसाद बालवयात चाणक्य होता, असाच खेळत असतानाआजोबा यांनी सांगितले की तु हुशार तर राहशील आणि मोठा अधिकारी होऊन लाल दिव्याची गाडी मिळेल हा आजोबांच्या आशिर्वादाची त्यांच्या कुटुंबीयांना आठवण आली…

Previous article▪️स्वातंत्र्य दिनानिमित्त 11 ते 17 ऑगस्ट पर्यंत “हर घर झेंडा” सप्ताह – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
Next articleसुकन्या समृद्धी योजनेतंर्गत बालिका सशक्तीकरण मोहिमेचे उद्घाटन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.