Home बुलढाणा सुकन्या समृद्धी योजनेतंर्गत बालिका सशक्तीकरण मोहिमेचे उद्घाटन

सुकन्या समृद्धी योजनेतंर्गत बालिका सशक्तीकरण मोहिमेचे उद्घाटन

49
0

आशाताई बच्छाव

IMG-20220628-WA0000.jpg

सुकन्या समृद्धी योजनेतंर्गत बालिका सशक्तीकरण मोहिमेचे उद्घाटन
ब्यूरो चिफ स्वप्निल देशमूख यूवा मराठा न्यूज बूलडाणा
बुलडाणा, : डाक विभाग हा गावपातळीवर शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलेला आहे. या विभागाचा पोस्टमन सर्वांना परिचीत आहे. डाक विभागात आता केवळ डाकसंबंधीत कामकाज होत नाही, तर बँकिंग, विमाविषयक योजनाही राबविण्यात येतात. त्यामुळे 10 वर्षाच्या आतील मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेत खाते काढून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी आज केले. ते जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात सुकन्या समृद्धी योजनेतंर्गत बालिका सशक्तीकरण मोहिमेच्या उद्घाटनीय कार्यक्रमात बोलत होते. यावेळी डाक अधिक्षक राकेश एलोमल्ली उपस्थित होते.

दरम्यान जिल्हाधिकारी श्री. रामामूर्ती यांच्याहस्ते मुलींना प्रातिनिधीक स्वरूपात सुकन्या समृद्धी योजनेचे पासबुक वितरीत करण्यात आले. त्यानंतर बुलडाणा डाक विभागाने तयार केलेल्या सुकन्या समृद्धी योजनेवरील जनजागृती पर लघु चित्रफीत दाखविण्यात आली. डाक अधिक्षक राकेश एल्लामेल्ली यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक डाक अधिक्षक गणेश अंभोरे यांनी केले. या कार्यक्रमास सहाय्यक डाक अधिक्षक नरेश शिंदे, उपविभागीय डाक निरीक्षक मेहकर निलेश वायाळ, पोस्टमास्तर रामप्रभू देशपांडे तसेच ग्रामीण डाक सेवक, अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते.

अशी आहे सुकन्या समृद्धी योजना

डाक विभागाने जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने सुकन्या समृद्धी योजनेती अनजागृती करण्यासाठी बालिका सक्षमीकरण मोहिम 27 जून पासुन सुरु केली आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश 10 वर्षाखालील प्रत्येक मुलीचे सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत खाते उघडून संपुर्ण जिल्हा ऑगस्ट 2022 पर्यंत 100 टक्के सुकन्या समृद्धी जिल्हा घोषित करणे असा आहे. सुकन्या खाते सर्व बचत योजनांमध्ये सर्वाधिक व्याज दर 7.6 टक्के देते. हे खाते किमान 250 रूपयाच्या ठेवीवर उघडले जाऊ शकते. या खात्यात एका आर्थिक वर्षात कमाल रक्कम 1.5 लाख रूपये जमा केली जाऊ शकते. जी कर सवलती साठी देखील पात्र ठरेल. या खात्याचा लॉक-इन कालावधी खाते काढलेल्या तारखेपासून 15 वर्षे व परिपक्वता कालावधी 21 वर्षे आहे. या खात्यातून 50 टक्के रक्कम ही मुलीच्या उच्च शिक्षणासाठी काढता येते. तसेच लग्नासाठी खाते बंद सुद्धा करता येते.

Previous articleमुळाणे ग्रामस्थातर्फ पोलिस उपनिरीक्षक प्रसाद रौंदळचा नागरी सत्कार
Next articleजिल्हास्तरीय बँकर्स समिती बैठक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here