Home नांदेड आगामी नगर परिषदेची निवडणूक प्रहार स्वबळावर लढणार – शंकर भाऊ वड्डेवार

आगामी नगर परिषदेची निवडणूक प्रहार स्वबळावर लढणार – शंकर भाऊ वड्डेवार

76
0

राजेंद्र पाटील राऊत

आगामी नगर परिषदेची निवडणूक प्रहार स्वबळावर लढणार – शंकर भाऊ वड्डेवार

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

राज्य निवडणूक आयोगाने न.पा निवडणुका डिसेंबर २१ जानेवारी २२ मध्ये होणार असल्याचे सांगितले आहे.यासाठी निवडणूक आयोगाने हालचाली सुरू केली आहेत.मागच्या डिसेंबर २०१६ साली झालेल्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शहरातील नागरिकांना मोठे मोठे अश्वासन देऊन,आर्थिक बळाच्या वापर करुन लोकांना आमिष दाखवून न.पा.निवडणुकीत धनदांडगे लोक नगरसेवक म्हणून निवडून गेले.आणि शहरातील नागरिकांना चक्क विसरून गेले आहेत.२०१६ च्या निवडणुकीत भाजपालास्पष्ट बहुमत मिळाले पण त्यावेळी लोकनियुक्त निवड पद्धतीने नगराध्यक्ष म्हणून काँग्रेस पक्षाचे बाबुराव देबडवार निवडून आले.या निवडणुकीच्या प्रचारात शहरातील नागरिकांना भुरळ घालण्यासाठी मुखेड नगरपलिकेच्या गेल्या निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष बाबुराव देबडवार यांनी आला बाबुराव…! आता आला बाबुराव…! म्हणत या मराठी गाण्याच्या ठेका धरून निवडणूक जिंकली होती.पुढे जाऊन जनतेचा विश्वासघात करून शहराच्या विकास न करता आपली वैयक्तिक पोळी भाजून घेण्यासाठी कधी काँग्रेसच्या तळ्यात तर कधी राठोड बंधुंच्या मळ्यात जाऊन शहरातील भोड्या-भाबड्या नागरिकांना येड्यात काढण्याचा प्रकार केला आहे.तर प्रतिस्पर्धी भाजपाने अच्छे दिन,सबका साथ सबका विकास म्हणत जनतेला गाजर दाखवून बहुसंख्य नगरसेवक निवडून आणले परंतु निवडून गेलेल्या नगरसेवकांनी गेल्या ५ वर्षात मुखेड शहरात कसलाही विकास केलेला नाही.मुखेड शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आहे.मुखेड शहरात सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे.शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे.डेंग्यू मलेरिया सारख्या भयानक बिमारीमुळे नागरिक हैराण झाले आहे.शहरात नाली व्यवस्थित साफ न केल्याने अनेकांच्या घरात घान पाणी शिरत आहे.लोकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे.शहरातील नागरिकांना भौतिक सुविधांचा अभाव आहे.नवीन वस्तीत मजबूत रस्ते नाही,विज पुरवठा नाही शहराच्या मुख्य रस्त्याने लावलेले एलईडी बल्प बंद आहेत.हे काम न करता बाबुराव देबडवार हे आपले सत्कार करून घेत हजारो लोक जमवून कोरोनाच्या फज्जा उडवत आहेत.कोरोना महामारीच्या काळात घरात दडून बसलेले काँग्रेसचे नगराध्यक्ष बाबुराव हे भाजपाचे कोरोना योद्धा कसे झाले.? याबाबत थोडं जनतेसमोर येऊन खुलासा करावा या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन शहरातील नागरिकांचे बेहाल केले आहेत.असे ही शंकर वड्डेवार यांनी बोलतांना सांगितले.पुढे बोलतांना म्हणाले की,शहरात चालू असलेला नंगा नाच थांबविण्यासाठी आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्ष शहरातील माय-बाप मतदार बांधवांच्या सहकार्याने वंदनीय ना.बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली न.पा.ची सार्वत्रिक निवडणूक स्वबळावर लढवणार आहोत यासाठी कार्यकर्त्यांनी झटून कामाला लागलेले आहेत.प्रहार जनशक्ती पक्ष ही निवडणूक, प्रस्थापितांच्या विरोधातील लढाई जिंकून मुखेड नगरपालिकेवर प्रहारच्या एकहाती झेंडा फडकवून मुखेड शहरातील घरानेशाही संपवून टाकणार आहे.असे जनशक्ति पक्षाच्या आढावा बैठकीत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकर आण्णा वड्डेवार यांनी बोलतांना सांगितले.यावेळी, प्रहारचे नवनिर्वाचित मुखेड तालुकाध्यक्ष शिवानंद बंडे,शहराध्यक्ष साईनाथ बोईनवाड,राहुल कंदमवार,गोपाळ पाटील हिवराळे जाहुरकर,बालाजी राठोड,अनिल घायाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Previous articleपाहुणे येती घरा….!, प्राप्तिकर विभागातील अधिकाऱ्यांना अजिदादांनी का दिली पाहुण्यांची उपमा?
Next articleकबनुर येथे विज पडुन बैलाचा मृत्यु पिडीत शेतकर्‍यांना प्रशासनाने तात्काळ मदत द्या रयत क्रांती संघटनेची मागणी.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here