Home नांदेड मुखेड तालुक्यात काँग्रेस पक्षाचा 136 वा स्थापना दिवस साजरा..

मुखेड तालुक्यात काँग्रेस पक्षाचा 136 वा स्थापना दिवस साजरा..

111
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तालुक्यात काँग्रेस पक्षाचा 136 वा स्थापना दिवस साजरा..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड – दिनांक 28 डिसेंबर 2020 रोजी मुखेड शहरात काँग्रेसचे शहर अध्यक्ष नंदकुमार मडगुलवार यांच्या संपर्क कार्यालयात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा 136 वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस नांदेड जिल्हा परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष श्री दिलीप पाटील बेटमोगरेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून काँग्रेसचा 136 वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रवक्ते दिलीप सावकार कोडगिरे उत्तम अण्णा चौधरी श्रावण रॅपनवाड श्याम एमेकर शेख मैनु साब जयप्रकाश कानगुले मारोती घाटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here