Home जालना क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिनी अभिवादन!

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिनी अभिवादन!

31
0

आशाताई बच्छाव

IMG_20231129_063429.jpg

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिनी अभिवादन!
देशात शांतता राहावी म्हणून जालन्यातून शांतीदुत सोडले
जालना/प्रतिनिधी दिलीप बोंडे 
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 133 वी पुण्यतिथी जालना शहर महानगरपालिकेत मंगळवारी (दि.28) साजरी करण्यात आली.
यावेळी जालना शहर महापालिकेचे कार्यालयीन अधिक्षक विजय फुलंब्रीकर यांच्यासह अखिल भारतीय ओबीसी एकता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब शिवाजीराव वानखेडे, शासकीय कंत्राटदार सुरेश रत्नपारखे , कडुबा वाकेकर, दशरथ तोडुळे, अखिल भारतीय माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सचिन वानखेडे, गंगुबाई वानखेडे, मंगला खांडेभराड, सावता तिडके, गोपी मोहिते, शिवलाल घाडगे,  अरूण वानखेडे, निखील पाऊलबुध्दे, बंडु जाधव, कु. ऋतुजा सुनिल खरात, अमर घायाळ,  चंद्रकांत लहु चव्हाण, किरण पाटील, विष्णु घायाळ,संदीप जैवाळ, वेदांत फुलंब्रीकर आदिंची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना बाबासाहेब वानखेडे म्हणाले की, ज्योतिबांनी शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यावर काम केले. जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी 1888 मध्ये बहाल केली. स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होते. यावेळी देशात शांतता राहो यासाठी शांतीदुत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले पुर्णाकृती पुतळ्यासमोरून सोडण्यात आले. यावेळी समता सैनिक व फुले अनुयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here