Home जळगाव चाळीसगावात सकल मराठा समाजाची निवडणुकी संदर्भात बैठक संपन्न

चाळीसगावात सकल मराठा समाजाची निवडणुकी संदर्भात बैठक संपन्न

90
0

आशाताई बच्छाव

IMG_20240319_204213.jpg

चाळीसगावात सकल मराठा समाजाची निवडणुकी संदर्भात बैठक संपन्न
~~~~~~~~~~~~~~
जळगाव लोकसभा निवडणुकीत जवळपास २० मराठा समाज बांधव उमेदवारी करणार…! ~~~~~~~~~~~~~~

चाळीसगाव-प्रतिनिधी विजय पाटील –लोकसभेच्या होवू घातलेल्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून राज्यात अनेक जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने मराठा समाजाचे उमेदवार उभे राहण्याचे संकेत मिळत आहे.त्या अनुषंगाने चाळीसगाव सकल मराठा समाजाच्या वतीने दि १८ मार्च २०२४ रोजी पवारवाडी स्थित विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे सकल मराठा समाजाच्या बैठकित एकमुखाने निर्णय घेऊन जळगाव लोकसभा निवडणुकीत जवळपास २० मराठा समाजाचे बांधव लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून यासाठी पुढील रणनीती तयार करण्यात आली आहे.
मराठा योद्धा आदरणीय मनोज दादा जरांगे-पाटील यांनी काढलेल्या मोर्चात वाशी येथे करोडोच्या संख्येने धडकलेल्या मराठा समाज बांधवांच्या मोर्चाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगे सोयऱ्यांची अधिसूचना देऊन मराठा समाजाला आश्वासित केले होते.की लवकरात लवकर सगे सोयऱ्यांचा कायदा करून राज्यातील सर्व मराठा समाजाला न्याय देऊ असे आश्वासन लेखी स्वरूपात दिलेले असताना देखील सरकार मराठा समाजाची दिशाभूल करून न टिकणारे वेळ काढू पणाचे दहा टक्के आरक्षण लागू केले आहे.मात्र ते जाहिर केलेले आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणार नसल्याने मराठा समाजात संतापाची लाट उसळली आहे.राज्य सरकार ने मराठयांची ठरवून जाणीव पूर्वक फसवणूक केल्या मुळे महाराष्ट्र राज्यात प्रत्येक जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने मराठा समाजाचे उमेदवार उभे राहण्याचे संकेत मिळत आहे.त्या अनुषंगाने चाळीसगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आज दि.१८ मार्च २०२४ रोजी पवारवाडी स्थित विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे सकल मराठा समाजाच्या बैठकित एकमुखाने निर्णय घेऊन जळगाव लोकसभेच्या निवडणुकीत जवळपास २० मराठा समाजाचे बांधव उमेदवार म्हणून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.जळगाव लोकसभा निवडणुकीसाठी ज्यांची सामाजिक-राजकीय आर्थिक परिस्थिती चांगली आहे.अशा मराठा समाज बांधवांनी उमेदवारी करण्यासाठी स्वईच्छेने पुढे यावे तसेच ज्या आर्थिक परिस्थिती साधारण आहे. परंतु त्यांना उमेदवारी करायची ईच्छा आहे.अशा समाज बांधवांना लागणारे आर्थिक नियोजन मराठा समाजातील दानशूर व्यक्तींकडून घेण्यात येणार आहे.ज्यांना सामाजिक भावनेतून सढळ हाताने मदत करायची असेल त्यांनी आवर्जून सहकार्य करावे. चाळीसगाव शहर व तालुक्यातून ज्या मराठा समाजाच्या बांधवांना जळगाव लोकसभा निवडणुकीत उमेदवारी करायची आहे.त्यांनी चाळीसगाव सकल मराठा समाजाच्या कोअर कमिटीच्या समन्वयक भाऊसाहेब सोमवंशी मो. ९८५०६७६६१६ ,गणेश पवार मो.९८२२७४१४२६,प्रशांत गायकवाड ९८५०५९२१४६ सुधीर पाटील मो. ७०२०७६६३६६,खुशाल बिडे मो.९८८१७६९८२४ यांच्या दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा सकल मराठा समाजाच्या बैठकीस गणेश पवार भाऊसाहेब सोमवंशी, तमाल देशमुख,खुशाल बिडे, सुधीर पाटील,प्रा चंद्रकांत ठाकरे,प्रमोद पाटील, प्रदीप निकम,सुदर्शन देशमुख, राजेंद्र पाटील,स्वप्निल गायकवाड,मुकुंद पवार,खुशाल पाटील,भरत नवले,विनोद जाधव, सतीश पवार,दीपक देशमुख, छोटू अहिरे,कैलास देशमुख, समर्थ भोसले, पवन पाटील, स्वप्निल गायकवाड , नंदकिशोर पाटील यांच्यासह अनेक समाज बांधव उपस्थित होते.

Previous articleलासलगाव शिवनदी व विंचूर लोणगंगा नदी संवर्धन प्रस्तावास शासनाची मान्यता
Next articleपराधीन आहे पुत्र जगती मानवाचा!” जिवलग दोस्त “हिरा” सारखे “मन” असलेल्या पवारची अनोखी कथा…!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here